Nashik Child Marriage Crime : निनावी कॉलने रोखला बालविवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child marriage

Nashik Child Marriage Crime : निनावी कॉलने रोखला बालविवाह

चांदोरी (जि. नाशिक) : बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे.असे असतांनाही आजही बालविवाह होत असल्याचे धक्कादायक वास्तव आज पुन्हा समोर आले आहे.

गुरुवारी (ता.१०) होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. नाशिक जिल्ह्यात सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत या पूर्वी ही तीन बालविवाह रोखण्यात आले आहेत. (Child marriage prevented by anonymous calls nashik crime news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भेंडाळी या गावामध्ये उजनी (ता. सिन्नर) येथील अल्पवयीन मुलगी हीच विवाह जऊळके (ता. दिंडोरी) येथील मुलासोबत होत असल्याचा निनावी कॉल जागरूक नागरिकाने नाशिक जिल्हा चाइल्ड लाईन केंद्र समन्वयक यांना प्राप्त झाला.

त्या नुसार तत्काळ हळदीच्या वेळी जात सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी वाय कादरी, भेंडाळी येथील ग्रामसेवक पी एस निपुंगळे, पोलिस पाटील संघटनेचे अरुण बोडके, स्थानिक पोलिस पाटील संजय चाबुकस्वार, सरपंच संजय खालकर, पोलिस नाईक मोठाभाऊ जाधव, प्रकाश वाकळे आदींनी संबंधित ठिकाणी जात मुलीच्या आई -वडिलांना मुलीचा विवाह तिचे वय १८ पूर्ण झाल्यावरच करण्याची सक्त ताकीद दिली. तसेच भविष्यात अशा पद्धतीचे कृत्य केले जाणार नसल्याचे बंधपत्रही मुलीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेत बालविवाह रोखला.