sakal
Girl Child Birth Rate
नाशिक: कच्चे रस्ते, मोडकी-तोडकी कौलारू घरे... जेमतेम शैक्षणिक व आरोग्य सुविधा.. पाणीटंचाई, भौतिक सुविधांचा पूर्णपणे अभाव... आदिवासीबहुल भागातील हे सामान्य चित्र. पण समाजाच्या दृष्टीने मागासलेल्या या तालुक्यांमध्ये २०२५ मध्ये मुलीचा जन्मदर सर्वाधिक राहिला. पेठमध्ये एक हजार मुलांमागे एक हजार ४८ मुलींच्या जन्माची नोंद आहे. तर औद्योगिक वस्ती असलेल्या सिन्नरमध्ये नीचांकी ८९३, त्याखालोखाल निफाड ९०१ मुलींच्या जन्माची नोंद आहे.