Children Mobile Addiction : मोबाईलच्या वापराने मुले ‘स्वमग्नते’चे शिकार; पालकांचे दुर्लक्ष, बौद्धिक विकास खुंटतोय

Mobile Addiction in Children
Mobile Addiction in Childrengoogle

Nashik News : मोबाईलचा अतिरेकी वापर, त्यावरील गेम्स, सतत टीव्हीसमोर बसून कार्टून्स पाहणे यामुळे चिमुकल्यांचे बालपण हरवत चालले आहे. मात्र, त्यामुळे चिमुकल्यांच्या मानसिक विकासावरच होणारा विपरीत परिणाम येत्या काळात चिंतेची बाब ठरू पाहत आहे.

न्यूरॉलॉजिकल डेव्हल्पमेंट डिसऑर्डर अर्थात ‘स्वमग्नते’सारखा विकार जडल्याने, ‘त्याच त्या’ काल्पनिक पात्रांच्यातच रमणाऱ्या चिमुकल्यांच्या मेंदूचाच विकास खुंटतो आहे. त्यामुळे अलीकडे मुलांच्या बौद्धिक वाढीकडे नीटसे लक्ष देणारे पालक मात्र मुलांच्या चिडचिडेपणाबद्दलच्या तक्रारी घेऊन बालरोगतज्ज्ञांकडे येण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे.

मोबाईल गेमिंगचा अतिरेकी वापर अन्‌ कार्टून पाहण्याच्या अट्टहासापायी चिमुकल्यांचे भावविश्‍वच ‘डेंजर झोन’मध्ये अडकत चालल्याचे वास्तव येत्या काळातील भीषण समस्या आहे.(Children become victims of loneliness with use of mobile phones nashik news)

बहुतांश घरांमध्ये पालक मुलांच्या हाती मोबाईल देत गेम्स खेळण्यात वा टीव्हीवरील कार्टून्स पाहण्यास लावून त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. तर, कोरोना काळात शाळाच बंद असल्याने ऑनलाइन शाळा होत्या. त्याचा परिणाम असा झाला की लहान मुलांच्याही हाती स्मार्ट फोन आले; परंतु यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर विपरित परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

कार्टून चॅनल्सवरील छोटा भीम, डोरेमॉन यांसारख्या काल्पनिक पात्रांच्या विळख्यात दोन-अडीच ते दहा वर्षांपर्यंतची मुले अडकताहेत; तर मोबाईलवर सतत गेम्स खेळण्यामुळे चिमुरडे सतत त्याच त्या भावविश्‍वात राहिल्याने अशी मुले स्वमग्नतेतच वावरतात. कौटुंबिक संवाद नसणे, मैदानी खेळांऐवजी घरांमध्येच बसून राहणे ही यामागची मुख्य कारणे.

त्यामुळे अशी मुले वास्तवातील भावविश्‍वाऐवजी काल्पनिक भावविश्‍वाला आपलेसे करीत असल्याने, त्यांच्याच चिडचिडेपणा, लठ्ठपणा, आक्रमकता वाढली आहे. वास्तवाचे भान नसल्याने न्यूनगंडही वाढीस लागत असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. परंतु, दरमहा दोन ते तीन टक्‍क्‍यांनी अशा बालकांचे वाढते प्रमाण ही मात्र चिंतेची बाब आहे.

चिडचिडेपणात वाढ

मुलांचा चिडचिडेपणा, जेवण न करणे, अतिलठ्ठपणा, आक्रमकपणा अशा तक्रारी घेऊन पालक आपल्या मुलांसह बालरोगतज्ज्ञांकडे येतात. त्या मुलांशी गप्पागोष्टी, चौकशीतून मुले सर्वाधिक वेळ मोबाईलवर गेम्स खेळणे व टीव्हीवरील कार्टून्स पाहणे यात घालवितात, ही बाब समोर येते.

Mobile Addiction in Children
Chandrashekhar Bawankule News : नाशिकसाठी बावनकुळेंचीच कसोटी! युतीत मोठी तडजोड करावी लागण्याची शक्यता

अशाच स्वरूपाच्या मुलांची येणारी संख्या महिन्याकाठी दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढते आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचा ओलावा नाहीसा होऊन कोरडेपणा मुलांमध्ये वाढतो आहे.

"लहान मुलांच्या प्रत्येक अवयवाची वाढ होण्यासाठीचा ठराविक काळ असतो. त्याच काळात तर त्यावर विपरित परिणाम होत असेल तर एकच नव्हे, तर अनेक शारीरिक-मानसिक समस्या उद्‌भवण्याचा धोका असतो. मोबाईलचा अतिवापर आणि टीव्हीच्या पात्रांमध्ये अनावश्‍यकरीत्या भावनिकरीत्या गुंतल्याने बालमनावर विपरित परिणाम होतो. त्यास पालकांचा दुर्लक्षपणा कारणीभूत आहे. लहान मुलांची बौद्धिक वाढ खुंटल्याने चिडचिडेपणा, आक्रमकता, न्यूनगंडता वाढली आहे. वेळीच लक्ष दिल्यास वाढत्या वयानुरूप स्वमग्नतेतून ती मुले बाहेर पडू शकतात." - डॉ. मिलिंद गांगुर्डे, बालरोगतज्ज्ञ

हे कराच

- लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा

- मोबाईलऐवजी मैदानावर खेळण्यासाठी घेऊन जा

- मेंदूला चालना मिळेल अशा विषयांची त्यांच्यात आवड निर्माण करा

- वयानुरूप मुलांमध्ये खेळण्याची, वाचनाची आवड लावा

- जिज्ञासावृत्ती वाढीसाठी त्यांच्याशी खेळा

- एकटे न सोडता, मुलांशी सतत संवाद साधा

Mobile Addiction in Children
Chhagan Bhujbal News : ओबीसी समाज कर्मकांडात आजही गुरफटलेला : मंत्री छगन भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com