शिक्षणासाठी दरेवाडीचे चिमुरडे निघाले उपाशीपोटी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात

students of ZP school Darewadi marching towards Igatpuri
students of ZP school Darewadi marching towards Igatpuriesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद झाली आहे.गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद केल्याने पालकांसह ग्रामस्थ सुद्धा संतापले आहेत.

येथील पहिली ते चौथीचे चिमुरडे विद्यार्थी दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी शुक्रवार ( ता.५ रोजी ) सकाळी ११ वाजता पायी निघाले आहेत. (Children of Darewadi went to office of Group Education Officer at igatpuri 20km walking for education nashik latest marathi news psl98)

किमान हे अंतर २० कि.मी. असून उपाशीपोटी शाळा सुरु करण्याचे आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी पायपीट करीत निघालेले आहेत.इगतपुरी तालुक्याच्या बेफिकीर शिक्षण प्रशासनाने शाळा बंद करण्याचा विचित्र निर्णय घेतल्याने ग्रामस्थ संतापलेले आहेत.

तर नशिकहुन नोकरी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी ५ कि.मी.पर्यंत पायी चालत असलेल्या चिमुकडयांना त्याच शाळेचे शिक्षकांनी येऊन मुलांना सांगायला कि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊ नका आमची नोकरी जाईल.मात्र विद्यार्थी चालत निघाले आहे.

students of ZP school Darewadi marching towards Igatpuri
Nashik : सर्वच भाज्या महागल्याने गृहिणींची पसंती कडधान्याला

दरम्यान काही शिक्षण विस्ताराधिकारी निव्वळ भटकण्यात पटाईत असून शाळांवर त्यांचे लक्ष नसल्याची तक्रार तालुक्यातील नागरिकांनी केली.

विस्ताराधिकारी मनमानी करून शाळा बंद करण्याचे अहवाल देत असल्याने पिंप्रीसदो येथे मुस्लिम बांधवांमध्येही संताप आहे.याबाबत शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची आजच भेट घेणार आहे.

एका आदिवासी दुर्गम शाळेतील एक शिक्षक बोरटेंभे शाळेत वर्ग केल्याने आणि दुसरा शिक्षक येतच नसल्याने त्या आदिवासी वाडीतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.तेथील विद्यार्थी शिक्षणापासून दुर होत असल्याबाबत खात्रीशीर वृत्त असून लवकरच दैनिक सकाळ आवाज उठवणार आहे.

students of ZP school Darewadi marching towards Igatpuri
Nashik Rain: नाशिकला पावसाने झोडपले; एका तासात 27 मिमी पावसाची नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com