Nashik Crime : महिलेने दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणावर कोयत्याने केले सपासप वार; तरुणाची प्रकृती चिंताजनक, हल्लेखोर महिला फरारी

महिलेने भररस्त्यात दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्याचा केला प्रयत्न.
The female suspect and her accomplice fleeing on a two-wheeler

The female suspect and her accomplice fleeing on a two-wheeler

sakal

Updated on

नाशिक - शहराजवळील विल्होळी परिसरात सोमवारी (ता. १३) दुपारी धक्कादायक घटना घडली. एका महिलेने भररस्त्यात दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सूरजकुमार सोळंकी (वय ३८, रा. नानावली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com