Chirag Abduction Case : चिमुकल्याने कथन केला 'तो' चित्तथरारक प्रसंग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chirag Kalantri

Chirag Abduction Case : चिमुकल्याने कथन केला 'तो' चित्तथरारक प्रसंग!

विकास गीते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : चित्रपटात दाखवलेल्या किडनॅपिंगचा हा प्रसंग आपल्या बाबतीत घडेल, अशी पुसटशी कल्पना या सिन्नर शहरातील आडत कांदा व्यापारी तुषार कलंत्री यांचा मुलगा चिरागच्या बाबतीत घडेल, असे कधी कोणाला वाटलेही नव्हते व गुरुवारचा दिवस हा अतिशय घटनाक्रमाने भरला जाईल, अशी कोणाला कल्पनाही नव्हती.

घराबाहेर खेळत असलेला चिराग काही घटकाच्या अवधीत गायब झाल्याने कुटुंबियांना होत्याचे नव्हते झाले होते. (chirag Kalantri Abduction Case Breathtaking Incident Narrated by chirag nashik news)

आई-वडिलांचा पंचप्राण असलेल्या प्रत्येक कुटुंबात चिमुकले मंडळी ही लाडकी असतात. ती जर घरी लवकर आली नाही, तर सर्व कुटुंबांचा जीव हा टांगणीला लागून असतो. पण घरापासून चिमुकला हा पाच ते सहा तास बाहेर राहिला, तर कलंत्री कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल हे सांगणेही कठीण आहे.

अपहरण कर्त्याने चिरागला गाडीत नेल्यावर चिमुकल्या चिराग याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, अपहरणकर्त्यांची दोन हात केले अर्थात त्यांच्याशी तो बोलत राहिला यामुळे तो आज हिरो ठरलेला आहे.

अशी वेळ कोणावर येऊ नये असे वाक्य चिरागचे कुटुंबाचे होते. सकाळशी बोलताना या चिमुकल्याने सर्व घटनाक्रम सांगितला, मी बाहेर खेळत असताना मला कोणतीही कल्पना नसताना मला दोघांनी ओमिनीत उचलून नेले. त्यानंतर त्यांनी मला पुढे जाऊन एका दुचाकी वर नेत, मला पाणी पाजले तसेच माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधत मी कोणत्या गावात आलेलो आहे हे सांगितले.

मला खोपडी मार्गे बारागाव पिंपरी तसेच दुबेर कडे नेल्याचे तो सांगतो, रात्री एक वाजेच्या पुढे मला त्यांनी पोस्ट ऑफिस समोर सोडल्याचे सांगतो. हे सर्व कथन करताना चिमुकला चिराग हा तसू भरही घाबरलेला नव्हता. घडलेल्या घटनेची तोंड देत त्याने सर्व अलबेल आहे, असेच सर्वांना सांगितले. सर्व सिन्नर करांची एकजूट व पोलीस यंत्रणेचे परिश्रम या जोरावर आज चिमुकला चिराग हा कुटुंबीयांना भेटल्याचे चिरागचे वडील तुषार. आई. आजोबा हे सांगत होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का!

सर्व पोलिसांवर सिन्नरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

घटनेचा तपास खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आला. घटनेचे गांभीर्य, दडपण, तणाव असतानाही सिन्नर पोलीस स्टाफ कुठेही ओव्हरॲक्ट न होता, निश्चितपणे व विश्वासाने तपास कार्यात मग्न असल्याचे पाहण्यास मिळाले.

पोलीस स्टेशनला गर्दी झाली होती. मात्र, प्रश्न विचारणाऱ्यांवर व गर्दीवरही चिडचिड न करता पोलिसांची तपासाची लगबग सुरू होती. हम जितेंगे हम जितेंगे आपने बाजी लगाकर '' भूमिकेतून आत्मविश्वासाने तपासकार्य सुरू होते.

हे सगळे चित्र पोलिसांची प्रतिमा उजळविणारे ठरले. रात्री अपहृत मुलगा सापडला आणि आरोपीही पकडल्याने गावात पोलिस तपासाविषयी सर्वत्र समाधान व कौतुक व्यक्त होत आहे.

वरीष्ठ अधिकारी अधीक्षक उमाप साहेब, सहा. अधीक्षक माधुरी कांगणे मॅडम, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे तसेच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एपीआय विजय माळी सर्व सिन्नर पोलीस कर्मचारी आणि तपासात सहभागी सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन; हा शानदार तपास सिन्नर करांच्या दीर्घकाळ लक्षात राहील! असे मत सिन्नर करांचे होते.

हेही वाचा: Nashik Crime News : साडेसहा लाखाची रोकड चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात!