Crime
sakal
नवीन नाशिक: सिडको परिसरात काही दिवसांपासून समाजकंटकांनी अक्षरशः दहशत माजवली असून बुधवारी (ता .२८) रात्री हा उन्माद पुन्हा उग्र स्वरूपात समोर आला. खुटवडनगर भागातील जनकनगरी परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळ पिक-अप गाडीतून आलेल्या चार ते सहा जणांच्या टोळक्याने किरकोळ वादातून थेट धारदार शस्त्रांचा वापर करत नागरिकावर प्राणघातक हल्ला केला. गर्दीच्या आणि वर्दळीच्या परिसरात निर्भयपणे झालेल्या या हल्ल्याने सिडकोतील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.