scrap shop fire
sakal
नवीन नाशिक: सिडको परिसरातील गणेश चौक भागात असणाऱ्या महेश भवन शेजारील एका भंगारच्या दुकानाला सोमवारी (ता. २७) पहाटे पाचला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या सिडको विभागाकडून शर्तीचे प्रयत्न करत विझविण्यात आली.