Water Wastage
sakal
नवीन नाशिक: सिडको परिसरात वारंवार वाहिनी फुटण्याच्या घटनांमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अभियंतानगर परिसरात शनिवारी (ता. ६) सकाळी अशाच प्रकारची घटना घडली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना वाहिनीला धक्का लागून ती फुटली. यामुळे मोठ्या दाबाने पाण्याचे फवारे रस्त्यावर उडू लागले आणि रस्त्यावर पाण्याचे पाट वाहायला लागले.