Nashik Crime News : सिनेस्टाईलने ट्रकमधील टायरची लूट; 8 लाखांच्या साहित्याची चोरी

crime news
crime news esakal

येवला (जि. नाशिक) : नाशिक - छत्रपती संभाजीनगर मार्गावर तालुक्यातील जळगाव नेऊर येथे पेट्रोलपंपावर उभ्या ट्रकमधील सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी ट्रक चालकाला मारहाण करत आपल्या ट्रकमधून नेत पोबारा केला आहे.

तालुका पोलिस ठाण्यात या चोरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालकांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव नेऊर ते अंगणगाव दरम्यान ही घटना घडली आहे. (Cinestyle loots truck tires 8 lakhs material theft Nashik Crime News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

crime news
Crime News : भयंकर घटना! दीड वर्षांच्या चिमुरडीचा पुरलेला मृतदेह उकरून काढून केला बलात्कार

नासीर मोहम्मद शरीफ खान हा ट्रकचालक ट्रकमालक निजामुद्दीन शाह याच्यासोबत जळगाव नेऊर येथे एचपी पेट्रोल पंपासमोर शनिवारी (ता.२५) मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास थोड्या विश्रांतीसाठी थांबले होते.

यावेळी दुसऱ्या ट्रकमधून आलेल्या चौघांनी नासीरखान आराम करत असलेला ट्रकचा (एम एच ०३ सीपी ६०४१) ताबा घेऊन ट्रकमालक निजामुद्दीन शाह यांच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करत तो ट्रक मुद्देमालासह सिनेस्टाईल पद्धतीने अंगणगाव येथील पद्मकुंज सोसायटीपर्यंत आणला.

यानंतर हा ट्रक निर्जन ठिकाणी नेऊन या ट्रकमधील ६८ टायर ६७ ट्यूब, ६८ नायलॉन फ्लप २ मोबाईल असा एकूण ८ लाख ८१२ रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्या ट्रकमध्ये काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजतात पोलिसांनी चौघा अनोळखी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले. या घटनेमुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत चोरट्यांना ट्रकमधील टायरबाबत माहिती असावी, असा कयास बांधला जात आहे.

crime news
Crime News : पैशासाठी थोरल्याने केला धाकट्याचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com