CISF
sakal
नाशिक रोड: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) त्यांच्या क्षमता बांधणीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. देशभरातील सहा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांमधून ११ हजार ७२९ नवीन प्रशिक्षित कॉन्स्टेबल/जीडी भरती त्यांच्या ऑपरेशनल फोल्डमध्ये सामील होत आहेत. या मोठ्या प्रमाणात झालेल्या भरतीमुळे दलाच्या एकूण ऑपरेशनल ताकदीत सुमारे आठ टक्के वाढ होणार आहे. जी दलाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या विस्तारांपैकी एक आहे.