#Lockdown : जिल्हाबंदी असूनही परदेशातून नागरिक नाशिकमध्ये! आरोग्य विभागासाठी मात्र मोठी डोकेदुखी!

corona 1.jpg
corona 1.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आहे. तसेच, जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही मुंबई-पुण्यात परदेशातून आलेले नागरिक नाशिकमध्ये येत आहेत. या येणाऱ्यांची कोणतीही माहिती आरोग्य विभागाला मिळत नसल्याने यंत्रणेसमोर मोठी डोकेदुखी ठरते आहेत. त्यातच, होम-क्वारंटाईन केलेल्या घरांवर महापालिका वा आरोग्य यंत्रणेकडून शिक्के आणि रुग्णाच्या हातावर शिक्के मारले जात आहेत, परंतु तरीही काही जण हे मोकळेपणे वावरत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळते आहेत. या साऱ्या प्रकारामुळे येत्या काळात मोठी समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता व्यक्त होते आहे. 

आरोग्य यंत्रणेसमोर डोकेदुखी : होम-क्वारंटाईनच्या घरांवर शिक्के 
कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा देशातील तिसरा टप्पा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आहे. या तिसऱ्या टप्प्यात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची आणि ती वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यातच, गेल्या 19 तारखेपासून राज्यातील विमानतळावरून परदेशातून आलेल्या एकाही नागरिकास त्याच्या जिल्ह्यात जाऊ न देण्याचा निर्णय झालेला आहे. तरीही नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये असे काही नागरिक दाखल झालेले आहेत. त्यांच्यासंदर्भातील कोणतीही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून वा शासनाकडून जिल्हा प्रशासन वा आरोग्य विभागाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे या अशा अचानक आलेल्यांची कोणतीही माहिती नसल्याने त्यांच्यापासून कोरोना विषाणूची कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्‍यता व्यक्त होते आहे. तर, या आलेल्यांची माहिती त्या-त्या परिसरातील शेजारी वा आसपासच्या नागरिकांकडून आरोग्य विभागाला मिळते आहे. 

तात्काळ संबंधितांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी
माहिती मिळाल्यानंतर सदरचा आरोग्य विभाग तात्काळ संबंधितांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करीत आहे. त्याच्या हातावर आणि घरावर शिक्का मारला जातो आहे. तसेच, होम क्वारंटाईन होण्याचे बंधनही घातले जाते आहे. असे असले तरी काहीजण हे मोकळ्या वातावरणात फिरत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळते आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com