विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू करा हो...

villagers giving demand letter
villagers giving demand letteresakal

अंबासन, (जि.नाशिक) : साहेब...आता तरी बस सुरू करा हो...शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अतोनात नुकसान होतेय हो...! परिवहन मंडळाकडून (MSRTC) अजूनही बहुतांश गावात बसेस (Buses) सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान खाजगी वाहनचालकांकडून वाजवी भाडे आकारून विद्यार्थी तसेच प्रवाशांची लुट केली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परिवहन मंडळाने करंजाड, नामपूर चक्री बस सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (Citizens of ambasan demanding MSRTC should start bus for students Nashik News)

गेल्या अनेक महिन्यांपासून विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता. यामुळे संपूर्ण राज्यातील बसेसेवा ठप्प झाल्या होत्या याचा फायदा खाजगी वाहनचालकांनी घेतला असला तरी शालेय विद्यार्थ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मिळेल त्या खाजगी वाहनांचा आधार घेऊन शाळेत पोहचत आहेत तर ब-याच विद्यार्थी वाहन नसल्याने अजूनही शाळेत पोहचू शकले नाहीत. बुधवार (ता.१५) पासून पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. दरम्यान बससेवा बंद असल्याने शाळेत पोहोचणार तरी कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नामपूर, आसखेडा या गावातील विद्यालयात पिंगळवाडे, करंजाड, निताणे, भुयाणे, आखतवाडे, आनंदपुर आदि भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र बससेवा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भिती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या परिसरात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बिजोटे येथील सरपंच पोपट जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी नुकतीच सटाणा आघारात व तहसील कार्यालयात करंजाड, नामपूर चक्री बस सुरू करण्यात यावी असे निवेदन सादर केले आहे.

villagers giving demand letter
नैताळेच्या मधुकर कोल्हेंनी लिहिली ८०० पानी ज्ञानेश्वरी

"...करंजाड, नामपूर ही चक्री बस विद्यार्थी तसेच प्रवाशांसाठी या परिसरात एकमेव बस आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बस सुरू करणे गरजेचे आहे."

- पोपट जाधव, सरपंच बिजोटे

villagers giving demand letter
Nashik : शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्‍या; काहींकडून स्‍वागताची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com