Nashik News : भटके जनावरे होताहेत गायब

Stray animals roaming in the area.
Stray animals roaming in the area. esakal

नाशिक रोड : गांधीनगर येथील रामलीला मैदानाजवळ फिरणारे भटक्या जनावरांना बेशुद्ध करून घेऊन जात असल्याचा आरोप येथील खेळाडू, रहिवाशांनी व नागरिकांनी केला आहे. सकाळी जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळतात. (citizens of this place alleged that stray animals were being taken unconscious nashik news)

अनेक जनावरे रात्री इंजेक्शन मारून ते बेशुद्ध केली जातात व त्यांना गाडीत टाकून किंवा गळ्याला दोरी बांधून नेले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मैदानावर दूध न देणारी भटकी जनावरे मालकाने येथे हिरवा चारा खायला सोडून दिलेली आहेत.

सध्या गेल्या दहा पंधरा दिवसापासून येथील २ ते ३ जनावरे गायब असल्याचे येथील रहिवासी सुनील मोदीयानी यांनी सांगितले आहे. या ठिकाणी पोलिस स्टेशन असून, पोलिसांना याबाबत सांगितले. तरी पोलिस याची दखल घेत नाही. या ठिकाणी किमान ४० ते ५० भटकी जनावरे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या रामलीला समितीचे कार्यकर्ते गस्त घालत असून, पोलिस प्रशासन व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Stray animals roaming in the area.
Nashik News : ज्योती जाधवची पुन्हा एकदा चमकदार कामगिरी; राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रांझ

"रामलीला मैदानावर अनेक वेळा भटकी जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे. त्यांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याचा अंदाज आहे. प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे." - शैलेश विश्वकर्मा, क्रिकेट कोच

"रात्री दोन ते चारच्या दरम्यान येथे अंधाराचा फायदा घेऊन काही लोक जनावरांना नेण्यासाठी गाड्या आणतात. रात्री इंजेक्शन मारून जनावरांना बेशुद्ध केले जाते. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी." - सुनील मोदीयानी, प्रत्यक्षदर्शी

"पोलिस प्रशासनाला कल्पना दिलेली असून कार्यवाही झालेली नाही. पोलिसांनी गस्त घातली नाही तर आम्ही स्वतः गस्त घालू. यासंबंधी पोलिस प्रशासनाला लवकरच निवेदन देणार आहोत."
- सुनील यशवंते, गोठाचालक

Stray animals roaming in the area.
Nashik News : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पिंपरवाडी येथील टोल प्लाझा कार्यान्वित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com