Nashik Epidemic Disease: साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त; NMCकडून औषध, धूर फवारणी करण्याची मागणी

Scattered filth and rain-soaked water puddles near Ghasbazar School.
Scattered filth and rain-soaked water puddles near Ghasbazar School.esakal

Nashik Epidemic Disease : रिमझिम पावसामुळे जागोजागी पाणी साचून डबके तयार झाले असून, अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय डोळे येण्याची साथही जोरात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेकडून उपाययोजना करत औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Citizens suffering from epidemic disease Demand for smoke spraying from NMC nashik)

जुने नाशिक परिसरासह पूर्व विभागातील विविध रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टसिटी विभागाकडून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणीही खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे.

ड्रेनेजची स्वच्छता झाली नसल्याने काही भागांमध्ये ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर येऊन तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. याशिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत.

रिमझिम पावसाने कचरा बुजून डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.

महापालिकेने याकडे लक्ष देत खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करावी, साचलेल्या पाण्यामध्ये औषध फवारणी करावी, ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी, रहिवासी भागांमध्ये औषधांसह धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Scattered filth and rain-soaked water puddles near Ghasbazar School.
Nashik Tehsildar Bahiram Bribe Case: लाचखोर तहसीलदाराच्या घराची रात्रभर झडती; हाती लागलं घबाड!

महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस समस्यांमध्ये वाढ होत आहे. नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाढलेल्या साथीच्या आजारांमुळे रुग्णालय रुग्णांनी भरले असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहेत.

तर दुसरीकडे डोळ्यांची साथही मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठीही जनजागृतीपर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

डासांपासून बचावाच्या वस्तूंना वाढली मागणी

पावसामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने होणाऱ्या संभाव्य घटना लक्षात घेता. नागरिकांकडून डासांपासून बचावासाठी विविध प्रकारच्या कॉइल, यंत्र, औषधे, मच्छरदाणी, तसेच इलेक्ट्रिक रॅकेट, क्रीम अशा विविध वस्तूंची मागणी वाढली आहे.

Scattered filth and rain-soaked water puddles near Ghasbazar School.
Dhule: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‘आस्था’ची चौकशी! महापौरांच्या तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यवाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com