Nashik Tehsildar Bahiram Bribe Case: लाचखोर तहसीलदाराच्या घराची रात्रभर झडती; हाती लागलं घबाड!

40 तोळे सोने, 15 तोळे चांदी अन रोकड!
Tehsildar Bahiram
Tehsildar Bahiramesakal

Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : जमिनीच्या उत्खननासंदर्भात फेरचौकशीवेळी लाचेची मागणी करून १५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक तालुका तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (ता. ५) अटक केली आहे.

अटकेनंतर त्याच्या घरात रविवारी (ता. ६) पहाटेपर्यंत झडती सत्र सुरू होते. या वेळी पथकाच्या हाती ४० तोळे सोन्यासह १५ तोळे चांदी व रोकड लागली आहे. दरम्यान, न्यायालयाने बहिरम यास ८ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Nashik Tehsildar Bahiram Bribe Case All night search of bribe takers house nasik crime)

लाचखोर तहसीलदार बहिरमच्या अटकेनंतर पथकाने कर्मयोगीनगरमधील त्याच्या घरात झडतीसत्र राबविले. रविवारी पहाटे पाच- साडेपाचपर्यंत चाललेल्या या झडतीसत्रात ‘लाचलुचपत’च्या हाती ४० तोळे सोने, १५ तोळे चांदी आणि चार लाख ८० हजार रुपयांची रोकड लागली आहे.

त्याच्या बँक खात्यांची माहिती घेण्यात आली असून, सोमवारी (ता. ७) संबंधित बँकांतील खाती ‘सील’ करून त्याची माहिती बँकेकडून घेतली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी लाचखोर बहिरम यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यास येत्या मंगळवार (ता. ८)पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tehsildar Bahiram
Nashik Crime: चाणक्यपुरीत एकावर प्राणघातक हल्ला

असे आहे प्रकरण

लाचखोर नरेशकुमार बहिरम (वय ४४, रा. कर्मयोगीनगर, नाशिक) हा नाशिक तालुका तहसीलदार होता. राजूर बहुला येथील जमिनीतून मुरमाच्या उत्खनन प्रकरणी जमीन मालकाला सुमारे सव्वा कोटीचा दंड आकारण्यात आला होता.

त्याविरोधात तक्रारदाराने विभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले असता, त्याच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्ष जागेवर निरीक्षणावेळी लाचखोर बहिरम याने तक्रारदाराकडे १५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

या तक्रारीच्या पडताळणीत सत्यता पटल्यावर ‘लाचलुचपत’च्या पथकाने सापळा रचून लाचखोर बहिरम यास १५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली.

Tehsildar Bahiram
Crime News: बीड हादरलं! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये केला बलात्कार अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com