Nashik : शहर बससेवा चालक-वाहकांची सुरक्षितता हल्ल्यांमुळे धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik city bus service

शहर बससेवा चालक-वाहकांची सुरक्षितता हल्ल्यांमुळे धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या बससह त्यावर काम करणाऱ्या चालक- वाहकांची सुरक्षितता वाढत्या हल्ल्यांमुळे धोक्यात आल्याने अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेत सुरक्षितता देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे चालकांनीदेखील वाढते हल्ले व रिक्षा चालकांच्या दादागिरीमुळे बस चालविणे मुश्‍कील झाल्याची तक्रार केली आहे.

महापालिकेकडून शहरात ८ जुलैपासून शहर बससेवा सुरू करण्यात आली. पाच टप्प्यात अडीचशे बस रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. सद्यःस्थितीत ४१ मार्गावर १२० बस सुरू आहे. लॉकडाउन पूर्णपणे उठल्यानंतर तसेच शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे नियमित सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. परिणामी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवासी संख्या वाढली आहे. सुटीच्या दिवशीदेखील बसचा रोजचा गल्ला आठ लाखांपर्यंत पोचला आहे. विशेष करून शहराच्या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून, सार्वजनिक वाहतूक सेवेचे कौतुक होत आहे.

मार्गिकांमध्ये वाढ करतानाच बसची संख्या वाढविली जाणार आहे. बससेवा ऐन भरात आली असून, गेल्या काही दिवसात सेवेला ग्रहण लागेल अशा दुर्घटना घडत आहे. सातपूर विभागात बसच्या काचा फोडण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी म्हसरुळ भागात बसच्या वाहक- चालकाला मारहाण झाल्याची घटना घडली. यासंदर्भात पोलिसांच्या हाती व्हीडिओ फुटेज पडल्यानंतर कारवाईची व्याप्ती वाढविण्यात आली. परंतु, व्हीडिओमध्ये महिला दिसत असूनही कारवाई होत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर सिटीलिंक कंपनीचे व्यवस्थापक बंड यांनी पोलिस उपायुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी करताना बसला संरक्षण देण्याची मागणी केली.

loading image
go to top