स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांची नाशिककरांसह दौड

marathon
marathonesakal

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्ताने नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित ७५ कि.मी. दौडचा अंतिम टप्पा उद्या, रविवारी (ता.१४) पहाटे पार पडणार आहे. या अंतिम दौडमध्ये नाशिक शहर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नाशिककरांनाही सहभागी होता येणार आहे. तरी यात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

marathon
Har Ghar Tiranga : 'झेंडा माझा, मी झेंड्याचा... पण साहेब तेवढं घराच बघा'

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध शासकीय विभागांमार्फत उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ७५ कि.मी. दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या दौडचे दोन टप्पे उत्साहात पार करण्यात आले आहेत. तर, रविवारी (ता.१४) अंतिम दौडचे आयोजन करण्यात आलेले आहे. १० कि.मी. अंतराच्या असलेल्या या अंतिम दौडला नाशिक शहर पोलीस मुख्यालयातून प्रारंभ होणार आहे. या दौडला पहाटे साडेसहा वाजता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे झेंडा दाखविणार आहेत. या दौडमध्ये पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुरुष-महिला पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच, यावेळेच्या दौडचे वैशिष्ट म्हणजे नाशिककरांना या दौडमध्ये सहभागी होणार आहे. यापूर्वीच्या दौडमध्ये नाशिक पोलीसांसह सेवाभावी संस्था, क्रीडा संस्था, खेळाडूही सहभागी झाले होते.

marathon
अमृत संस्थेचे मुख्यालय पुण्यात; शिंदे- फडणवीस सरकारचा नाशिककरांना दणका

या दौडनंतर सहभागी तीन महिला पोलीस, तीन पुरुष पोलिसांना पारितोषिक देऊन शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. आयुक्तालयातील सुमारे ९०० ते ९५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या दौडमध्ये आत्तापर्यंत सहभाग घेतला आहे.

...असा आहे दौडचा मार्ग

शहर पोलीस मुख्यालय, आयुक्तालय, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, जुने पोलीस आयुक्तालय, शरणपूर पोलीस चौकी, मायको सर्कल, चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस, अशोक स्तंभ, पोलीस आयुक्तालय व पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर समारोप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com