नाशिक : पाचही प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात | Nashik Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik municipal corporation elections

नाशिक : पाचही प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

sakal_logo
By
विक्रात मते


नाशिक :
महापालिका निवडणुकीत (Nashik Municipal Corporation Elections) प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरणार आहेत. मात्र, एकीकडे स्वतःचा प्रभागात प्रचार करताना संपूर्ण शहराकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने शहराध्यक्ष यांना त्यांच्याच प्रभागांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी राजकीय डावपेच सुरू झाले आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू असताना राजकीय खेळपटीदेखील व्यवस्थित केल्या जात आहे. नाशिक शहरातील नेत्यांचे दौरे विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्त राजकीय वातावरण तयार होत आहे. यंदाच्या निवडणुकीत शहरातील महत्त्वाच्या पाच पक्षांचे शहराध्यक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे शहराध्यक्षांना स्वतःचा प्रभाग सांभाळताना शहरातील सर्वच मतदारसंघांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. दोन्ही जबाबदारी सांभाळताना शहराध्यक्षांची तारांबळ उडेल. शहराध्यक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याने स्वतःला निवडून येणे महत्त्वाचे ठरेल. शहराध्यक्ष त्यांच्या प्रभागात अडकून पडले तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने आडाखे बांधले जात आहेत.

हेही वाचा: 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

...अशी होईल लढत
* शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सिडकोतील सावतानगर, त्रिमूर्ती चौक या पारंपरिक प्रभागातून निवडणूक लढणार हे निश्चित आहे. स्वतःच्या प्रभागाकडे लक्ष देताना त्यांच्यावर संपूर्ण शहराचीदेखील जबाबदारी आहे.

* भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे हेदेखील तिडके कॉलनी, मायको सर्कल भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र, पालवे यांनी पक्षाच्या प्रोटोकॉलमुळे पत्ते खुले केलेले नाही.

* राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे महात्मानगर परिसरातून तयारी करत आहे. यापूर्वी त्यांच्या मातोश्री दोनदा या भागातून निवडून आलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रंजन ठाकरे हे नागरिकांपर्यंत विविध कामांच्या माध्यमातून पोचत आहे.

* नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या गुरमित बग्गा यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी अद्याप दिली नसली तरी त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, औपचारिक घोषणा होणे आहे. पंचवटी भागातून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

*मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर अंबड भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचा त्यांचा दावा आहे.

हेही वाचा: नाशिक | मालेगाव हिंसाचारप्रकरणी नव्याने आठ जणांना अटक

loading image
go to top