Citylinc Bus Offer : या महिन्यापासून मिळणार दिव्यांगांना बसमध्ये मोफत प्रवास

Citylinc news
Citylinc newsesakal
Updated on

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून १ नोव्हेंबरपासून दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत पास योजना लागू राहणार आहे. ४० किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारीच्या दिव्यांगांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागेल.

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा व आधार कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता लागेल. महापालिका हद्दीतील दिव्यांग प्रवाशांनाच काढता येणार आहे. १४ ऑक्टोबरपासून सिटीलिंक पास केंद्रावरून सदर मोफत पास काढता येणार. १ नोव्हेंबरपासून ते ३१ मार्चपर्यंत पास राहील. एप्रिलपासून पुढील वर्षासाठी पुन्हा नवीन पास काढावा लागेल. (Citylinc Bus Offer From november for disabled people will get free bus travel Nashik Latest Marathi News)

Citylinc news
Nashik : मृतदेहावर मुंग्या फिरत असल्याची Video Viral!

सहप्रवाशालाही सवलत

६५ टक्के किंवा ६५ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्यास व मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असलेल्या प्रवाशालादेखील तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी पास काढतेवेळी सिटीलिंक सिस्टिम मध्ये ६५ टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे अपलोड केलेले हवे. अन्यथा मोफत पास असलेल्या प्रवाशासोबत असलेल्या कुणालाही तिकिटात सवलत मिळणार नाही.

Citylinc news
Nashik : ‘त्या’ ठेकेदाराविरोधात कळवण पोलिसांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com