Nashik : आणखी 3 मार्गांवर धावणार Citylinc बस; जाणुन घ्या मार्ग

Nashik Citylinc Latest Marathi News
Nashik Citylinc Latest Marathi Newsesakal

नाशिक : येथील नाशिक महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक) यांच्‍यातर्फे बससेवेची व्‍याप्ती वाढविताना तीन नवीन मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी धावत असलेल्‍या मार्गांच्‍या यादीत आणखी तीन मार्गांची भर पडणार आहे. (Citylinc buses to run on 3 more routes Nashik Latest Marathi News)

या निर्णयानुसार आता नवीन सीबीएस ते कोणार्कनगर (संकलेचा सोसायटी) मार्गे निमाणी, अमृतधाम या नवीन मार्गाचा समावेश केलेला आहे. मार्गावर सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून रात्री पावणेनऊपर्यंत एकूण २० बस फेऱ्‍या असतील.

तसेच, नवीन सीबीएस ते पार्क साइड मार्गे अमृतधाम, बीडी कामगारनगर या नवीन मार्गाचाही समावेश केलेला आहे. या मार्गावर सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत एकूण १८ बस फेऱ्‍या होतील.

नवीन सीबीएस ते मोहाडी हा तिसरा नवीन मार्ग आहे. म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, आंबे असा बसचा मार्ग असेल. सकाळी साडेपाचपासून सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांपर्यंत एकूण १६ बस फेऱ्‍या धावतील. प्रवाशांची संख्या वाढत असताना मागणी लक्षात घेता नवीन मार्ग वाढविले आहेत.

Nashik Citylinc Latest Marathi News
अमेरिका व महाराष्ट्रातील विद्यापीठांत शैक्षणिक देवाण घेवाणीची गरज : कोश्यारी

अन्‍य मार्गांवरील फेऱ्या वाढविल्या

काही मार्गांवरील बस फेऱ्यांमध्ये वाढ केलेली आहे. त्‍यानुसार आता निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे त्रिमूर्ती चौक, कामटवाडे - या मार्गावर नवीन चार बस गाड्यांची संख्या वाढविली असून, आता या मार्गावर एकूण आठ बसगाड्या धावतील. दर पंधरा मिनीटांनी या मार्गावर बस सुटतील.

तसेच नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, सिव्हिल, सातपूर, अशोकनगर या मार्गावरील बस फेऱ्‍यांमध्येही वाढ केली असून, अर्धा तासाऐवजी आता दर पंधरा मिनीटांनी या मार्गावर बस उपलब्‍ध असेल. नाशिक रोडपासून सिम्बोसिस महाविद्यालय मार्गे सीबीएस, पवननगर, उत्तमनगर या मार्गावरील बस फेऱ्‍यांमध्ये वाढ केल्‍याने या मार्गावरही दर पंधरा मिनिटांनी बसगाड्या उपलब्‍ध असतील.

Nashik Citylinc Latest Marathi News
अनेक बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसणार : BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com