Nashik Citylinc Protest: सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप टळणार?

Citylinc
Citylincesakal

Nashik Citylinc Protest : सिटीलिंक कंपनीकडे वाहक पुरवठादार कंपनीला बोनस व वेतनासाठी नोटीस दिल्यानंतर आज वाहकांच्या खात्यात ५७ लाख रुपये जमा करण्यात आल्याने संप तूर्त होणार नाही. (Citylinc employees will not go on protest nashik news)

एक कोटी चाळीस लाख रुपये दंडाची रक्कम समायोजित करावी, अशी मागणी ठेकेदाराची आहे. वाहक व चालक देखील आउटसोर्सिंगद्वारे भरती करण्यात आले आहे. यापूर्वी ठेकेदार मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीने वेतन न दिल्याने पाच वेळा संप पुकारण्यात आला. सिटीलिंक कंपनीने ठेकेदाराला एक कोटी ४० लाखांचा दंड केला आहे.

ठेकेदाराने एक कोटी चाळीस लाख रुपयांचा विविध कारणांसाठी आकारला जाणारा दंड नियमबाह्य असल्याचा दावा केला.

Citylinc
Nashik ZP News : जि. प. माध्यमिकचा पदभार वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी देवरेंकडे

परंतु, नियमानुसारच दंड आकारला जात असल्याने सिटीलिंकने दंड समायोजन करण्यास नकार दिला.

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. दिवाळी बोनस न दिल्याने सिटीलिंक कंपनीने सोमवारी नोटीस बजावली. ठेकेदारा कंपनीकडून बुधवारी (ता. ८) एकूण ४६० वाहकांच्या खात्यात ५७ लाख रुपया वेतन जमा करण्यात आले. बोनस जमा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे तूर्त दिवाळीत होणारा संप टळण्याची शक्यता आहे.

Citylinc
Nashik Dengue Disease: डेंगीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 90 बाधित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com