Citylinc Training : सिटीलिंक चालक- वाहकांसाठी मार्गदर्शन शिबिर

CItylinc Team
CItylinc Teamesakal

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून चालविल्या जाणाऱ्या शहर बससेवेचा प्रवास अधिक सुखकर होण्याबरोबरच प्रवाशांकडून अधिकाधिक सिटीलिंक सेवेचा वापर व्हावा या उद्देशाने चालक व वाहकांसाठी रविवारी (ता. १३) मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. सिटीलिंक, पोलिस प्रशासन व नाशिक फस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबिर पार पडले. (Citylinc Training Orientation Camp for Citylink Driver Carriers Nashik News)

CItylinc Team
Bharat Jodo Yatra : छात्र भारतीचे कार्यकर्ते राहुल गांधींबरोबर 16 KM चालले

शिबिराच्या पहिल्या सत्रात मोटिव्हेशनल ट्रेनर व द आर्ट ऑफ सक्सेसचे संचालक अभय बाग यांनी उपस्थित चालकांना ट्रॅफिक अवेअरनेस व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये बस चालविताना चालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, चालकांची प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांप्रती असलेली जबाबदारी, प्रवाशांसोबत असलेले सकारात्मक वर्तन, प्रवाशांसोबत संभाषण करताना मनावर संयम ठेवण्याबरोबरच आपली बस स्वच्छ ठेवणे, फेरी सुरू करण्यापूर्वी बसचे पार्ट तपासून घेणे अशा अनेक मुद्द्यांवर चालकांना मार्गदर्शन केले.

सिटीलिंक व जनतेचे नाते अखंड टिकविण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दुसऱ्‍या सत्रात वाहतूक शाखा युनिट २ चे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेळके यांनी चालकांना मार्गदर्शन केले. या वेळी शेळके यांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगताना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आरटीओ नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येक चालकाची जबाबदारी असल्याचे शेळके यांनी सांगितले.

CItylinc Team
LPG Rates Hike : ग्रामीण भागात गॅसधारक पुन्हा चुलीकडे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com