bus ticket
sakal
जुने नाशिक: एकाच मार्गावरील सिटीलिंक बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक वेळेस दहा रुपयांचे, तर दुसऱ्या दिवशी १७ रुपयाचे तिकीट देण्यात आले. अशाप्रकारे एका दिवसांत ७ रुपयांची वाढ कशी, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. प्रवाशांनी वाहकास याबाबत विचारणा केली असता, त्यांना मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात आला. दरम्यान, सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे म्हणाले, की द्वारका सर्कल कामामुळे सिटीलिंक बसचे मार्ग बदलण्यात आले आहे. परंतु बस प्रवासाच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आली नाही.