नाशिक- येथील नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) यांच्यातर्फे शहर बससेवा देताना प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान विसरलेल्या, गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तू कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत दिल्या असून, यामुळे त्यांच्यावर शाब्बासकीची थाप प्रवाशांनी मारली आहे. ‘सिटीलिंक’च्या माध्यमातून विविध मार्गांवर हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कधी गर्दी, कधी घाईगडबड, तर कधी काही प्रवासी आपल्या वस्तू बसमध्येच विसरतात.