Clapping Therapy : टाळ्या वाजवा अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!; आरोग्‍याला होतोय फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Clapping Therapy

Clapping Therapy : टाळ्या वाजवा अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!; आरोग्‍याला होतोय फायदा

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : टाळ्या वाजवल्‍याने फायदे होतात. शाळेत टाळ्या वाजवण्याचा होणारा व्यायाम, आरती करताना टाळ्या वाजवल्याने एकाग्रता अन स्फूर्ती मिळते याची अनुभूती आपण घेतली असेल. टाळ्या वाजवल्‍याने मज्‍जातंतू, रक्‍तवाहिन्या उत्तेजित होतात. आपल्‍या उत्‍साहात भर पडते. टाळ्या वाजवल्‍याने ‘ॲक्युपंक्चर' होत असल्‍याने शरीराचे आरोग्‍य सुधारण्यास मदत होते. तसेच प्रतिकारशक्‍तीत वाढ होते, असे अभ्यासक सांगतात. (Clap your hands and boost immunity Health benefits of Clapping Therapy nashik news)

शहरातील विविध भागातील उद्यान, मैदान, मोकळ्या जागेत महिलांप्रमाणे पुरुषांचे समूह एकत्रितपणे टाळ्या व्यायाम करताना आपणाला दिसतात. तळहातात सुमारे ३० ‘प्लस ॲक्युप्रेशर पॉइंट्स' असतात. टाळ्या वाजवल्‍याने ते सक्रिय होतात. मुख्यत्वे पाठ, मान, हृदय, फुफ्फुसे, पोट आदींसह विविध अवयवांना हे ‘पॉइंट्‌स' जोडलेले असल्‍याने शरीरास फायदा होतो.

टाळी व्यायाम प्रकारात दोन्ही हातांनी वाजवलेली, बोटांवरील, तळव्यांवरील, मनगटावरील, हाताच्या मागील बाजूने वाजवलेली, एका हाताने दुसऱ्या हाताच्या तळव्यावर बुक्का स्वरुपातील टाळीसह एकमेकांत बोटे गुंतवणूक पुन्हा तीच क्रिया करत होणाऱ्या घर्षणाने बोटावरील सर्व ‘पॉइंट' उत्तेजित होतात.

कसे होतात फायदे?

टाळ्यांमुळे निर्माण होणारी ऊर्जा शारिरिक व मानसिक असे उत्‍तेजक म्‍हणून कार्य करते. टाळी वाजवताना आपले पूर्ण शरीर एकाग्र होते. तसेच, टाळी वाजवताना दोन्ही हाताचे एकसारखे ‘पॉइंट' हे एकमेकांवर समप्रमाणात आदळल्‍याने ‘ॲक्युपंक्चर' होते. शरीरातील रक्‍त परिसंचरण सुधारते. मूत्रपिंड, पचनसंस्‍था व पाठीचा खालचा भागाच्या आरोग्‍यात भर पडते. हृदयाचे आरोग्य व रक्‍तदाब प्रमाणात राहाण्यास मदत होते.

मज्‍जातंतूच्या कार्याला चालना मिळाल्‍याने दमा संबंधित समस्‍या सुधारण्यास मदत होते. मुलांमध्ये मेंदूचे कार्य सुधारते. हस्‍तलेखन सुधारते आणि शुद्धलेखनाच्या चुका कमी होतात. टाळ्या वाजवल्याने पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. वारंवार संसर्गापासून बचाव होतो. संधिवात तसेच, एखाद्या अवयवाशी संबंधित वेदनांच्या बाबतीत नियमित टाळ्या वाजविल्‍यामुळे हाडांचे आरोग्‍य सुधारते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : सुगरणीच्या घरट्यात ‘माळ मुनिया'ची विन; नांदुरमध्यमेश्‍वर पक्षीतिर्थातील चित्र

सर्व कार्य सफलतेने सिद्धीस

व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं ।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ॥

अर्थात व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घायुष्‍य, शक्‍ती व प्रसन्नता प्राप्त होते. स्‍वस्‍थ राहणे हेच भाग्‍य आहे. कारण, त्‍यामुळे सर्व कार्य सफलतेने सिद्धीस नेऊ शकतो.

"रोज सकाळी आम्‍ही ७ ते ८ मैत्रिणी मिळून टाळ्यांचा व्यायाम करतो. त्यात सुरवातीच्या व्यायाम प्रकारात आम्‍ही टाळी वाजवण्याचा व्यायाम करतो. त्यामुळे शरीरातील मरगळ दूर होऊन शरीर स्फूर्तिदायक होते. पुढील व्यायामासाठी अधिकचा उत्साह येतो."

- रीना टेंभेकर (गौरी ग्रुप महिला मंडळ, पाथर्डी फाटा)

"टाळ्या वाजविल्‍यामुळे शरीरातील रक्‍ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते. कोलेस्‍ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सहज शक्‍य असा अतिशय उत्‍तम व्यायाम प्रकार आहे."

-डॉ. भगतसिंग पाटील

हेही वाचा: Nashik ZP News : अनुकंपावरील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी; 118 उमेदवार प्रतीक्षेत