Nashik Crime News : दहिपूल भागात आर्थिक वादातून 2 गटात हाणामारी, एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shops in Dahipool area were vandalized after a dispute between two villages.

Nashik Crime News : दहिपूल भागात आर्थिक वादातून 2 गटात हाणामारी, एक गंभीर

जुने नाशिक : दहिपूल परिसरात आज रात्री पावणेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये आर्थिक वादातून जोरदार हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तीन वाहनांची तर एक दुकानाचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी जादा कुमक तैनात केली आहे. (Clash between 2 groups due to financial dispute in Dahipool area one serious Nashik Crime News)

रविवारी (ता.१५) सर्वत्र संक्रांतीचा उत्सव सुरू असताना भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीवर दहिपूल परिसरात दोन गटात अचानक हाणामारी सुरू झाली. यात ऋषी खैरे आणि प्रकाश रणमाळे असे दोघे जखमी झाले आहे. रणमाळे याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

या मारहाणीत सोनिका मॅचिंग सेंटर दुकानाची तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे. मारहाणीची घटना सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली, मात्र तिची सुरवात भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाली आहे. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत माहिती घेण्यात आली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेने दहिपूल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Crime News : घरात नेऊन नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तरुणांचा सामूहिक बलात्कार; मोबाईलमध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ

मारहाणीची घटना घडवून आणत संशयितांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भद्रकाली आणि सरकारवाडा दोन्ही पोलिस ठाण्यातर्फे दहिपूल परिसरात गस्त वाढविण्यात आली असून पोलिस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला होता.

दहशत पसरविण्याचा प्रयत्न

रविवारी सायंकाळपासून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात होता. परिसरातील दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले होते. भीतीपोटी येथील सर्व दुकानदारांनी रात्री सातच्या सुमारास दुकाने बंद करून घेतले होते. त्यानंतर रात्री पावणे नऊच्या सुमारास वाद उफाळून येऊन मारहाणीची घटना घडली अशी चर्चा परिसरात सुरू होती.

हेही वाचा: Nagpur Crime News: ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी