Nashik Crime: कोळीवाडा भागात 2 गटात तुंबळ हाणामारी; दगडफेकीमुळे तणाव, 3 जण जखमी

Beating News
Beating Newsesakal

Nashik Crime : लहान मुलगा रस्त्याने गात जात असल्याचा राग येऊन कोळीवाडा भागात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मारहाणीत तीन जण जखमी झाले आहे.

जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अनिकेत गणेश राठोड, इम्तियाज शमशुद्दीन शेख, निजामुद्दीन बाबू शेख असे जखमींची नावे आहेत. जखमींपैकी एकाचा मुलगा रस्त्याने गात जात असल्याचे कारणातून मंगळवारी (ता.३) रात्री साडेदहाच्या सुमारास वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली. (Clash between 2 groups in Koliwada area Tension due to stone pelting 3 injured Nashik Crime)

एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरिष्ठांना माहिती देत अतिरिक्त बंदोबस्त मागविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य चौकीतील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जमावापुढे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी कारवाई करत कर्मचारी विशाल वाघ यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या ११ जणांवर दंगल, मारहाण, गंभीर दुखापत केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तत्परता दाखवत गोरख चिमाजी चाहाळे (४९), ऋषिकेश गोरख चहाळे (२०), रोहन प्रकाश चौधरी (२४), चेतन लहानू भोई (२४), सचिन लहानू भोई (२३) या पाच जणांना अटक केली आहे.

Beating News
Jalgaon Crime : झाडाला गळफास घेऊन अनोळखी पुरुषाची आत्महत्या

तिघेजण उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल असून, तीन जण अद्याप फरार आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

इम्तियाज शेख यास डोक्यात गंभीर स्वरूपात दुखापत झाली असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना दोन दिवसाची पोलिस कुठली सुनावण्यात आली आहे. दरम्यान, फटाके वाजवल्यावरुन वाद झाल्याचीही चर्चा परिसरात सुरू होती.

Beating News
Jalgaon Crime : दुचाकीला टांगलेल्या पिशवीतून 1 लाख 10 हजार लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com