
Nashik News : कामाच्या अनुभवावरून सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार! राज्य शासनाचा निर्णय
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या अनुभवाच्या आधारे पदोन्नती दिली जाणार आहे. या संदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
नाशिक महापालिकेमध्ये अनेक स्वच्छता कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहे. अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना शासनाने शिक्षणाची अट टाकली होती, परंतु सर्वच स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिक्षणाची अट लागू होत नाही. (Cleaning staff will get promotion based on work experience Decision of State Govt Nashik News)
त्यामुळे अनुभवाच्या आधारे पदोन्नती मिळावी, अशी मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची होती. त्याअनुषंगाने आमदार फरांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने नाशिक महापालिकेकडून अहवाल मागविला.
अहवालानुसार शासनाने अनुभवाच्या आधारे विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या सहीने महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
हेही वाचा: Nashik News : दलित वस्तीच्या विकासकामांना 31 कोटींचा निधी!
अग्निशमन कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता
अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्निशामक पथकात नेमणूक करताना जोखीम भत्ता वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम पाचशे रुपयांवरून पाच हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली. आमदार फरांदे यांचे सफाई कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
या वेळी सुनील फरांदे, दर्शन बलसाने, घनश्याम गायकवाड, विशाल घोलप, विजय थोरात, एकनाथ ताठे, विजय जाधव, संदीप गांगुर्डे, संग्राम साळवे, जितेंद्र परमार, सुशील परमार, जयेश रबरिया, शैलेश शिंदे, चिंतामण पवार, अजय ढोमसे, संजय सोनवणे, राहुल तांबट, संतोष गायकवाड, अनिल गांगुर्डे, विशाल आवारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!