नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment

नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!

आडगावच्या ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यापासूनची प्रक्रिया ऑनलाइन होती. त्यात सुमारे तीन वर्षांनी पोलिस भरती होत आहे. (naroshankarachi ghanta missed opportunity due to tickmark police recruitment nashik news)

शासकीय नोकरीमध्ये १०० टक्के पारदर्शक पद्धतीने नोकरीची संधी असलेली एकमेव संधी म्हणजे पोलिस भरती. त्यामुळे लाखो तरुण-तरुणींनी यासाठी मेहनत घेतली आहे. तर, आडगावच्या मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या भरतीसाठी दररोज सुमारे एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविले जात आहे.

त्यासाठी बोलाविण्यात येणाऱ्यांना त्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाप्रमाणेच ऑनलाइन आवेदन पत्र पाठविण्यात आलेले आहे. सुरवातीला तरुणांची मैदानी चाचणी होणार असून, त्यानंतर तरुणींची मैदानी चाचणी होणार आहे.

असे असतानाही बुधवारी (ता. ४) एक तरुणी मैदानी चाचणीसाठी आली होती. तिच्याकडे आजच्याच तारखेची ऑनलाइन आवेदन पत्रही होते. परंतु मुलींची मैदानी चाचणीच नसल्याने अधिकारी बुचकळ्यात पडले.

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : आम्ही थांबावं का जावं...?

शेवटी तिला मैदानाकडे प्रवेश दिला गेला परंतु तशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तरुणीकडे असलेले ऑनलाइन पत्र असल्याने शंका घेण्याचेही काही कारण नव्हते. शेवटी तिने भरलेल्या ऑनलाइन अर्जाची छाननी करण्यात आली. त्यावेळी अर्ज भरताना या तरुणीने मेल (पुरुष) आणि फिमेल (महिला) यापैकी एकावर टीक-मार्क करताना मेलच्या रकान्यात केल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे ती तरुणी असतानाही ऑनलाइन अर्जानुसार तिची नोंद पुरुषांमध्ये झाली आणि त्यानुसार तिला आजच्या मैदानी चाचणीसाठी आवेदन पत्र पाठविले गेल्याचे समोर आले. एका टीक-मार्कमुळे तिची पोलिस भरतीची संधी मात्र ती गमावून बसली.

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?