चांदवडमधील स्वच्छतादूतांवर उपासमारीची वेळ

chandwad municipal council
chandwad municipal councilSakal
Summary

कोरोनाचा चांदवड शहरात शिरकाव होण्याच्या आदीपासून शहराच्या स्वच्छतेसाठी खासगी ठेकेदाराच्या कंत्राटाला अधीन राहून अनेक महिला, पुरुष, तरुण नागरिक स्वच्छताकर्मी म्हणून चार वर्षांपासून कार्यरत होते.

गणूर (जि. नाशिक) : कोरोनाकाळात (Coronavirus) स्वच्छतेच्या अनुषंगाने चांदवड शहर स्वच्छ, सुंदर राखण्यात ज्या सफाई कामगारांनी महत्त्वाची भूमिका निभावली, अशा स्वच्छतादूतांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. चांदवड नगर परिषदेने दिलेला घनकचरा व्यवस्थापन ठेका कालावधी संपुष्टात आल्याने अनेक कामगार सध्या बेरोजगार होऊन घरी बसले आहेत. (cleaning workers in chandwad lost their jobs after the contract expired)

कोरोनाचा चांदवड शहरात शिरकाव होण्याच्या आदीपासून शहराच्या स्वच्छतेसाठी खासगी ठेकेदाराच्या कंत्राटाला अधीन राहून अनेक महिला, पुरुष, तरुण नागरिक स्वच्छताकर्मी म्हणून चार वर्षांपासून कार्यरत होते. आजवर स्वच्छ, सुंदर शहर जपण्यात या हातांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घनकचरा स्वच्छता कंत्राटाचा ठेका कालावधी संपल्याने १ जूनपासून आजवर या सर्व स्वच्छताकर्मींवर घरी बसण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, नवीन ठेक्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू असून, त्यासंबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यलयात सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती चांदवड नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली. दुसरीकडे नवीन ठेका ठरत नाही तोपर्यंत घरी बसलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना नगर परिषदेंतर्गत सामावून घेऊन हाताला काम द्यावे, अशी मागणी स्वच्छता कामगारांनी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्याकडे निवेदन सादर करत केली आहे.

(workers lost their jobs due to expiration of contract given by chandwad municipal council)

chandwad municipal council
नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com