Cleanliness Drive: जिल्ह्यात 1993 ठिकाणी एक तास श्रमदान!

Cleanliness Drive
Cleanliness Driveesakal

Cleanliness Drive : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील एक हजार ९९३ ठिकाणी ‘एक तारीख-एक तास’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे यांसह स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत श्रमदान केले. (Cleanliness Drive One hour labor donation in 1993 places in district nashik)

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ सप्टेंबर २०२३ पासून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सकाळी दहाला एकाचवेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

केंद्राच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील सर्व महसुली गावांचे फोटो व माहिती भरण्यात आली. राज्यात विहित वेळेत सर्वप्रथम माहिती भरल्याबद्दल राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी नाशिक जिल्ह्याचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शनिवारी दुपारी याबाबत गटविकास अधिकारी व सर्व यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या. मोहिमेसाठी तालुक्यातील खासदार, आमदार आदींना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.

Cleanliness Drive
Cleanliness Drive : महापालिकेतर्फे उद्या गोलाणी संकुल स्वच्छता मोहीम; वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून सफाई करणार

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खासगी कार्यालयांचा परिसर, पर्यटनस्थळ, बसस्थानक, धार्मिकस्थळ, नदीकिनारे इत्यादी ठिकाणी उपक्रम आयोजित करण्यात आला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम असल्याचे जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी येथे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे व आमदार दिलीप बनकर यांनी निफाड तालुक्यात श्रमदान केले. राज्याच्या पाणी व स्वच्छता अभियानाचे अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी नाशिक तालुक्यातील महिरावणी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून श्रमदान केले.

Cleanliness Drive
Cleanliness Drive: ‘स्वच्छता हीच सेवा'! शहरात विविध ठिकाणी ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’ मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com