Nashik News: अंदरसूल ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेचा फज्जा! आरोग्य केंद्रासमोरच साचले दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे

School children wading through sewage water on the road in front of the Anganwadi and Primary Health Centre
School children wading through sewage water on the road in front of the Anganwadi and Primary Health Centreesakal

Nashik News : एक तास स्वच्छतेसाठी अभियान राबविण्याचा नारा शासनाने दिला असला, तरी अंदरसूल ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे१ ऑक्टोबरला गावातील रस्त्यावर भूमिगत गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळेने काढलेल्या स्वच्छता रॅलीतील मुलांना अक्षरशः गटारीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. (Cleanliness scam from Andarsul Gram Panchayat pool of sewage water accumulated in front of health center Nashik News)

गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रस्त्यालगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालय आहे. अगदी हाकेच्या अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय असतानाही स्वछतेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

निकृष्ट दर्जाच्या असलेल्या भूमिगत गटारींच्या काही चेंबरला ढापेच नसल्याने अक्षरशः गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी व रुग्णांना दुर्गंधीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, स्वच्छता मिशनचे मोठमोठे फलक झळकविणाऱ्या ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अंगणवाडीजवळील गटारीच्या चेंबरला ढापे नसल्याने उघड्यावरील गटारीत डुकरांच्या संचाराने अंगणवाडीतील बालक, सेविका, मदतनीस यांनाही दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत अंगणवाडीसेविका सौ. जाधव यांनी व्यक्त केली.

School children wading through sewage water on the road in front of the Anganwadi and Primary Health Centre
Nashik Political News: जनता दलाला (सेक्युलर) शानेहिंद निहाल अहमद यांची सोडचिठ्ठी

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वच्छता रॅलीतील मुलांनाही गटारीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागण्याची नामुष्की ओढावली. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

"प्राथमिक आरोग्य केंद्राने रस्त्यावर साचत असलेल्या गटारीच्या पाण्यासंदर्भात ग्रामपंचायतकडे कुठलेही लेखी पत्र दिलेले नाही."-भारत मोहिते, ग्रामविकास अधिकारी, अंदरसूल

"अंदरसूल प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात साचत असलेल्या गटारीच्या पाणी समस्यासंदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायतला कळविले आहे. त्यावर अंदरसूल ग्रामपंचायतने कुठलीही उपाययोजना केली नाही. पाण्याच्या व्हिडिओ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहेत."

-जयश्री पवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंदरसूल

School children wading through sewage water on the road in front of the Anganwadi and Primary Health Centre
Onion Crisis: बंदमुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ! लासलगाव बाजार समितीत शुकशुकाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com