Nashik Political News: जनता दलाला (सेक्युलर) शानेहिंद निहाल अहमद यांची सोडचिठ्ठी

Nashik Political News: जनता दलाला (सेक्युलर) शानेहिंद निहाल अहमद यांची सोडचिठ्ठी

मालेगाव : जनता दलाचे (सेक्युलर) सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रातील एनडीएशी युती केल्याने जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) आपल्यासह शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सोडचिठ्ठी देत आहेत.

शहरातील सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देणे अतिशय वेदनादायी आहे. तथापि जातीयवादी शक्तींशी लढा देण्याकरिता मरहूम निहाल अहमद यांचे विचार कायम ठेवत धर्मनिरपेक्ष शक्तींना मजबूत करण्यासाठी पक्ष सोडत असल्याचे जनता दल शहर जिल्हाध्यक्षा शानेहिंद निहाल अहमद व सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्निटी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Shanehind Nihal Ahmeds resignation to Janata Dal Secular Nashik Political News)

पुणे येथे राष्ट्र सेवा दलाच्या भवनात ३० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत प्रदेश जनता दलाने श्री. देवगौडा यांच्या निर्णयाची असहमती दर्शवत बहुसंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीला आमच्यासह ज्येष्ठ नेत्या साजेदा निहाल अहमद या उपस्थित होत्या. अनेकांनी देवगौडांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. तथापि देवगौडा यांचा निर्णय झाल्याने पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती शानेहिंद म्हणाल्या, की माझे वडील व गुरु निहाल अहमद १९५० पासून राजकारणात होते. ते आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वांशी मरेपर्यंत कायम राहिले. सत्तेसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

देशातच नव्हे तर जगभरात जातीयवादी शक्तींनी ज्या ज्या वेळी डोके वर काढले त्यावेळी सर्वप्रथम श्री. अहमद यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलन झाले. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पतन झाल्यापासून संविधानाची हत्या झाल्याचा आरोप करीत त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ दंडावर काळी पट्टी बांधून ती मरेपर्यंत कायम राहिली.

देशभरातील प्रमुख समाजवादी नेत्यांची छबी मला त्यांच्यात दिसत होती. त्यांचे विचार ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ कायम राहिले.

आमचे देखील घर व घराबाहेर सारखेच आचरण राहिले आहे. सध्याचे केंद्र सरकार मथुराम गोडसेची भूमिका मांडणारे आहे. महात्मा गांधी या पक्षांची मजबूरी झाली आहे.

श्री. डिग्निटी म्हणाले, की निहाल अहमद यांच्या निधनानंतर जनता दलाने ‘मेरा शहर मेरा दबदबा’ या नावाने मोहीम सुरु करत निहाल अहमद यांचा विचार मांडणाऱ्या १२ हजार सदस्यांची नोंदणी केली.

हे सर्व सदस्य आमच्या समवेत आहेत. राज्यातील जनता दल नेत्यांनी आगामी निर्णयासाठी एक समिती तयार केली आहे. आम्ही देखील शहरातील कार्यकर्ते व नागरिकांना विश्‍वासात घेवून पुढील भूमिका ठरवू.

राज्य पातळीवरील नेते धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेला अग्रक्रम देवून निर्णय घेतील अशी आशा आहे. त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहू. योग्य निर्णय न झाल्यास त्यावेळी भूमिका ठरवू असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर रशीद येवलेवाले, माजी नगरसेवक सोहेल करीम, अब्दुल बाकी, सय्यद सलीम, खुर्शीद काबूल, आरिफ हुसेन पापा, मौलाना शकील शम्सी, मोईन अख्तर आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोसम पुल चौकातील महत्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

Nashik Political News: जनता दलाला (सेक्युलर) शानेहिंद निहाल अहमद यांची सोडचिठ्ठी
Onion: बंद बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मुळावर! कांदा व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

शानेहिंद यांना अश्रू अनावर

आमच्या कुटुंबात धर्मनिरपेक्षतेचा विचार खोलवर रुजला आहे. गेली साडेचार दशके वडीलांचे राजकारण मी जवळून पाहिले. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील १९८८ पासून शहरात जनता दल आहे.

जनता दलातील तत्कालीन नेते शरद यादव यांनी जनता दलाशी युती केल्यानंतर पक्षात फूट पडली. १९९९ मध्ये जनता दल (सेक्युलर) ची निर्मिती झाली. जनता दलच्या पुढे सेक्युलर हा शब्द लावण्याची सूचना स्वत: निहाल अहमद यांनी केली.

चारेवाली बाई हे चिन्ह आमच्या नसानसात भिनले आहे. पक्ष सोडतांना अतिशय वेदना होत आहे हे सांगतांना पत्रकार परिषदेत शानेहिंद यांना अश्रू अनावर झाले.

गळ्यातील ओढणीने अश्रू पुसत नव्याने त्या त्यांची भूमिका सांगू लागल्या. आगामी काळात समाजवादी की कॉंग्रेस यावर त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही.

Nashik Political News: जनता दलाला (सेक्युलर) शानेहिंद निहाल अहमद यांची सोडचिठ्ठी
Nashik Agriculture News: शेतशिवार फुलल्याने शेतमजुरांना दिलासा; डाळिंबासह इतर फळपिकेही बहरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com