Nashik Press CSR Fund: प्रेस सीएसआर फंडातून 12 गावांना घंटागाड्या; 1 कोटी 8 लाख रुपयांचा निधी

Currency Note Press
Currency Note Pressesakal

Nashik Press CSR Fund : प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालय महामंडळाच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) फंडातून तालुक्यातील बारा गावांना घंटागाडया मिळणार आहे. प्रथमच अशी घंटागाड्याची मदत मिळणार आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रशासनाने त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून बारा घंटागाड्यांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

आता येत्या काही दिवसात नाशिक तालुक्यातील बारा गावांना कचरा उचलण्यासाठी नवीन कोऱ्या घंटागाड्या उपलब्ध होणार असल्याचे प्रेस प्रशासनाने खासदार हेमंत गोडसे यांना दिले. (Clocks to 12 villages from Press CSR Fund 1 crore 8 lakh fund nashik)

नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सामाजिक दायित्व निधीतून नाशिक लोकसभा मतदारसंघातील ६१ गावांना घंटागाड्या उपलब्ध होण्याकामी निधीसाठी दोन वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा सुरू होता.

वर्षभरापूर्वी प्रेस प्रशासनाने पाच घंटागाड्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर खासदार गोडसे यांनी अधिकच्या घंटागाड्या उपलब्ध होण्यासाठी दिल्ली येथील प्रेस प्रशासन मुख्यालयी प्रयत्न सुरू केले.

खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रेस प्रशासनाने बारा घंटागाड्या खरेदी करण्यासाठी एक कोटी आठ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Currency Note Press
Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमधील आमदारांच्या नाराजीवर चर्चा? शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री खलबतं

निधी मंजुरीचे पत्र भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रण निर्माण निगम लिमिटेडच्या एचआर विभागाचे जनरल मॅनेजर प्रकाश कुमार यांनी इंडिया सेक्युरिटी प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर यांना पाठविले आहे.

नाशिक तालुक्यातील गिरणारे, सामनगाव, गोवर्धन, लहवित, संसरी, सय्यद पिंपरी, लाखलगाव, पळसे, शिंदे, जाखोरी, कोटमगाव, शेवगेदारणा या गावांसाठी घंटागाड्या उपलब्ध होणार आहेत.

Currency Note Press
NMC News : राज्याच्या कार्यालयांना घरपट्टी, तर केंद्रीय कार्यालयांना सेवा कर! महापालिका करणार करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com