नाशिक जिल्ह्यातील पाऊस : सप्तशृंगी गडावर ढगफुटी, पेठला एकजण बुडाला

cloudburst on Saptashrungi Gad Monsoon Update News
cloudburst on Saptashrungi Gad Monsoon Update Newsesakal

नाशिक : नाशिक जिल्ह्यात रविवार (ता.१०) दुपारपासून संततधार पाऊस (Rain) सुरू असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील या दमदार पावसामुळे (Heavy Rain) जिल्हातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. गंगापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गोदावरील पूर आला आहे. दरम्यान जिल्ह्यात अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पूरस्थिती उद्बवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. (Cloudburst on Saptashrungi temple 1 drowned in Peth Latest Monsoon Update News)

जिल्हाभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शहरात दहा पंधरा मिनिटे थांबत तो सतत कोसळत आहे, पश्‍चिम पट्ट्यातील दमदार पावसामुळे गंगापूर धरणातून १० हजार ३५, दारणातून १५ हजार ५७२, तर नांदूरमधमेश्‍वरमधून ६९ हजार ५६२ क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

नाशिकमधील होळकर पुलाखालून १३ हजार ४२३, ठेंगोडा बंधाऱ्यातून २८ हजार १०० क्युसेस विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणाचे १४ दरवाजे २ फुटाने उचलून २२ हजार ५०० क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. चणकापूरमधून दुपारी सुरु करण्यात आलेला २३ हजार ६६५ क्युसेस विसर्ग कमी करत २१ हजार २७२ क्युसेसपर्यंत आणण्यात आला आहे.

याशिवाय कडवामधून ६ हजार ७१२, गिरणा नदीतून २७ हजार क्युसेस, पूनंदमधून १० हजार २६५ क्युसेस विसर्ग सुरु होता.

सप्तशृंगगडावर ढगफुटी

महालपाटणे (ता. देवळा) गावाला पुराचा धोका वाढला असून पेठ तालुक्यात एक जण नाल्याच्या पुराच्या पाण्यात बुडाला आहे. त्याचा दुपारपासून शोध सुरु आहे. वणी येथील सप्तशृंगीदेवी गडावर ढगफुटी होऊन गडाच्या पायऱ्यावर पाण्याचा लोंढा आला.

ढगफुटीमध्ये निर्मलाबाई नानू नाईक (वय ४४, रा. एरंडोल), पल्लवी लक्ष्मण नाईक (रा. एरंडोल), आशिश तरारे (वय २३, रा. नागपूर), मनीष राऊत (वय ३२, रा. नागपूर), शालू वासुदेव अवचट (रा. सप्तशृंगीदेवी गड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करुन वणी येथे पाठवण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे की नाही, याचा शोध घेत आहेत.

पथकाचे उपप्रमुख मंगेश केदारे, कर्मचारी, ग्रामस्थ आदींचा त्यात समावेश आहे. रेल्वेसह वाहतुकीवर पावसाचा विपरित परिणाम झाला आहे. नाशिक महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथे गोदावरीच्या पुरात अडकलेल्या ६५ जणांची महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

पावसामुळे काठावर धार्मिक विधी

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अंबोली परिसरात रात्री बारा ते पहाटे सहापर्यत १६०, पहाटे सहा ते दुपारी बारा ८० मिलिमीटर पाऊस झाला. सततच्या वाढत्या पावसामुळे दुपारी महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

गोदावरीच्या पुरामुळे आज सकाळपासून नाशिकमधील काठावर पडत्या पावसात धार्मिक विधी झाले आहेत. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यावर गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी पोचली होती. गोदाकाठच्या टपऱ्या आणि दुकाने हलवण्यासाठी व्यावसायिकांची तारांबळ सकाळी उडाली होती.

वरुणराजाच्या धुवांधार ‘बॅटींग'मुळे गिरणा, कादवा, पूनंद, म्हाळुंगी, तास, मोसम, बाणगंगा, पाराशरी नदीच्या पुराने आक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. तसेच सुरगाणा तालुक्यातील नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी, पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

जिल्ह्यात १२७.२ टक्के पाऊस

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम अशा २४ धरणांमधील जलसाठा ४६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्यावर्षी याच कालखंडात २७ टक्के जलसाठा होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ५५ टक्क्याच्या पुढे पोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२७.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असलेल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने या तालुक्यातील पावसाची टक्केवारी आता ५६.९ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. कळवण, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर या आदिवासी तालुक्यात अतिवृष्टीने दणका दिला आहे.

cloudburst on Saptashrungi Gad Monsoon Update News
गोदेचा पहिलाच पूर पाहण्यासाठी उसळली गर्दी: चारला रामसेतू पाण्याखाली

जिल्ह्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा

सोमवारी (ता.११) सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात आतापर्यंतच्या पावसाची झालेल्या नोंदीची टक्केवारी दर्शवते) : कळवण-९४.१ (१९२.५), सुरगाणा-२३९.८ (१६२.५), दिंडोरी-९९.३ (२२२.३), इगतपुरी-९९.२ (५६.९), पेठ-१८७.६ (१७५.७), त्र्यंबकेश्‍वर-१६८ (१०३.५), मालेगाव-२४.९ (१८७.८), बागलाण-३५.७ (१६५.७), नांदगाव-१६ (१५०.४), नाशिक-५९.८ (१२३.७), निफाड-४५.३ (१५०), सिन्नर-१०.४ (१११.९), येवला-३०.४ (१०२.७), चांदवड-५४.२ (२०१.४), देवळा-२९ (१६३.७).

अतिवृष्टीने कहर केलेल्या मंडलामध्ये चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : कळवण तालुका-कनाशी-१२५.५, दळवट-१२०.५, अभोणा-१२५.५. सुरगाणा तालुका-उंबरठाण-२७७.३, बाऱ्हे-२१६.३, बोरगाव-२२१.३, मनखेड-२०६.८, सुरगाणा-२७७.३. नाशिक-मखमलाबाद-९०.५. दिंडोरी तालुका-उमराळे-१०५.३, ननाशी-२१२.५, कोशिंबे-१२८. इगतपुरी तालुका-घोटी-१२९.५, इगतपुरी-१२९.५, धारगाव-१२९.५. पेठ-जोगमोडी-१९९.३, कोहोर-१८१.३, पेठ-१८१.८. त्र्यंबकेश्‍वर तालुका-वेळुंजे-१६८, हरसूल-१६८, त्र्यंबकेश्‍वर-१६८.

सोमवारचा पाऊस मिलीमीटरमध्ये

(सकाळी सात ते सायंकाळी पाच यावेळेत)

- पेठ : १६८

- सुरगाणा : १४०

- इगतपुरी : १०३

- नाशिक : ३८

- त्र्यंबकेश्वर : ९३

- बागलाण : ४३.६०

- सिन्नर : ३१

- येवला : २९

- दिंडोरी : ७०

cloudburst on Saptashrungi Gad Monsoon Update News
पावसामुळे बाजार समितीत 15 % पालेभाज्या आवक; संततधारेने शेतकऱ्यांना झटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com