CM Devendra Fadnavis Nashik rally
Sakal
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ नाशिकमधून फुटणार आहे. येत्या गुरुवारी (ता. १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कामांचे उद्घाटन होईल.
यानिमित्त भाजपतर्फे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप कार्यालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाही. मंगळवारी (ता. ११) सायंकाळपर्यंत सभास्थळ निश्चित होईल.