विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

CM Fadnavis On Dindori Accident दिंडोरीत विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्यालगतच्या विहिरींचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेत.
Fadnavis Orders Audit After Dindori Accident

Fadnavis Orders Audit After Dindori Accident

Esakal

Updated on

नाशिक येथे विहिरीत कार कोसळून ६ विद्यार्थ्यांसह एकाच कुटुंबातल्या ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कार कोसळल्यानंतर रस्त्याकडेला असणाऱ्या विहिरींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. राज्यात जिथे कुठे रस्त्यांच्या कडेला किंवा रहदारीच्या ठिकाणी अशा विहिरी आहेत, त्यांचे तात्काळ ‘ऑडिट’ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तेथे संरक्षक भिंत बांधणे किंवा आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com