Police Action
sakal
नाशिक, जुने नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. १३) नाशिकमध्ये आले असता, त्यांच्याविरोधात विविध प्रश्नी आंदोलनाची शक्यता होती. शहर पोलिसांनी याबाबत सतर्कता बाळगत संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. तसेच, संबंधितांच्या घरासमोर पोलिस नेमण्यात येऊन नजरकैद करण्यात आले.