Nashik News : मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरास CM एकनाथ शिंदे यांची सपत्नीक भेट

CM shinde with his wife
CM shinde with his wifeesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिरगाव (ता. सिन्नर) येथील श्री ईशान्येश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेत विधीवत पूजा केली. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे येत दर्शन घेतले. विशेष म्हणजे हा संपूर्ण दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. (CM Eknath Shinde with his wife visit to Ishanyeshwar Temple in Mirgaon Nashik Latest Marathi News)

CM shinde with his wife
Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

शिर्डी येथे दुपारी दोनला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मंत्र्यांचा ताफा सिन्नरच्या दिशेने रवाना झाला. दुपारी चारला ईशान्यश्वर मंदिरात दाखल होत मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पूजा केली. श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, विश्वस्त नितीन गांगुर्डे, डॉ. निरंजन निर्मळ, अरविंद बावके, रमेश हिंगे, दीपक लोंढे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप आदी उपस्थित होते

मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता. ते शिर्डीत दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांच्या दौऱ्याची माहिती समजली. साईबाबांचे दर्शन आटोपल्यावर ते पुन्हा विमानतळाकडे जातील असे वाटत असताना वाहनांचा ताफा कोपरगावच्या दिशेने रवाना झाला. कदाचित समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जात असावेत असे प्रारंभी वाटले. मात्र सावळीविर फाट्यावरून पुन्हा संपूर्ण लवाजमा सिन्नरच्या दिशेने रवाना झाला. पाथरे गावाच्या पुढे आल्यानंतर ईशान्येश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने सर्व वाहने थेट मंदिरात पोहोचली.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

CM shinde with his wife
Winter Temperature : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम; कारसूळला पारा 5 अंश सेल्सिअसवर

मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगितले. ईशानेश्वर मंदिरातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री कुणाशीही एक शब्द न बोलता थेट वाहनात जाऊन बसले होते. तेथून वाहने पुन्हा शिर्डी विमानतळाकडे रवाना झाली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सिन्नरमार्गे रस्ते मार्गाने मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.

जनतेच्या सुखाचे साकडे

मुख्यमंत्री दर्शनासाठी येणार ही बाब दुपारी दोनला समजली. दौऱ्याबाबत संपूर्ण गोपनीयता ठेवण्यास सांगण्यात आले. कॅप्टन अशोककुमार खरात वगळता या दौऱ्याची कुणालाही माहिती नव्हती. चारला मुख्यमंत्री मंदिरात आले. त्यांनी श्री ईशान्येश्वराला विधीवत अभिषेक केला. राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, राज्यातील जनता सुखी व होऊ दे असे साकडे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ईशान्यश्वराला घातल्याचे विश्‍वस्त नामकर्ण आवारे यांनी सांगितले.

CM shinde with his wife
Nagpur News | खोटे पसरविणाऱ्यांपासून सावध राहा : विश्वास पाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com