Winter Temperature : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम; कारसूळला पारा 5 अंश सेल्सिअसवर

Winter Temperature
Winter Temperatureesakal

नाशिक : उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर आज चौथ्या दिवशी कायम राहिला. किमान तापमान आज जळगावमध्ये ९.२, नंदुरबारमध्ये ११.६, तर नाशिकमध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतके राहिले. कारसूळ (ता. निफाड, जि. नाशिक) येथे सर्वात कमी म्हणजे, ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Cold continues in North Maharashtra Mercury at Karsul at 5 degrees Celsius nashik news)

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Winter Temperature
Nashik News : 5 रुपयाच्या नोटेवर अघोषित बंदी!; व्यावसायिकांकडून घेण्यास टाळाटाळ

हवेतील गारठ्यामुळे भरलेली हुडहुडी अंगातून निघण्याचे नाव घेईना. त्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करणे पसंत करण्यात आले. नाशिकमधील गारठ्याला शनिवारपासून (ता. १९) सुरवात झाली. त्यादिवशी १०.४, रविवारी (ता. २०) ९.८, सोमवारी (ता. २१) ९.२ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. तसेच जळगावमध्ये रविवारी ८.५, काल ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते.

आज उस्मानाबादमध्ये ९.९, पुणे व महाबळेश्‍वरमध्ये प्रत्येक ठिकाणी ११.२, औरंगाबादमध्ये १०, नगरमध्ये १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात काल ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानामुळे थंडीचा जोर अधिक राहिला. रविवारी ९.७ अंश सेल्सिअस तापमान पुण्यात होते. औरंगाबादमध्ये रविवारी ९.२, काल ८.९ अंश सेल्सिअस तापमान राहिले.

गारठा राहिलेल्या भागातील तापमान

गारठा राहिलेल्या भागातील आज नोंदवलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे : नांदेड-१६.२, परभणी-१४.२, सातारा-१५.५, उदगीर-१७.५, मालेगाव-१५.२, डहाणू-१६.५, बारामती-१३.४, सांताक्रूझ-१७, जालना-१३, माथेरान-१५.२.

Winter Temperature
Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com