त्र्यंबकेश्वर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रे’ला शनिवारी येथून प्रारंभ झाला. यावेळी पालखीतील राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी असलेल्या जलकलशांचे दर्शन घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, अण्णासाहेब मोरे, युवराज महाराज होळकर आदी.
Sakal
नाशिक : ‘‘ नद्या परस्परांना जोडून महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळाचे संकट दूर केले जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जलसंपदा विभागामार्फत शनिवारी (ता.२५) ‘गोदा ते नर्मदा’ या जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.