नाशिक: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपल्या कार्यक्षमतेचे प्रत्यंतर देत मागील सात महिन्यांत तीन हजार ५४२ रुग्णांना एकूण ३२ कोटी ३२ लाख पाच हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत पुरवली आहे.