
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना गड व किल्ल्यांची ऐतिहासिक संपत्ती देशाला दिली आहे. मात्र काळाच्या ओघात गडकिल्ल्यांची होणारी पडझड थांबविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २१) केली. (CM Shinde announcement in Nashik Fort Authority set up for conservation of forts Nashik Latest Marathi)
कालिदास कलामंदिरामध्ये नाशिकरत्न पुरस्काराच्या वितरण समारंभानिमित्ताने बोलताना त्यांनी घोषणा केली. ते म्हणाले, राज्यातील गड व किल्ले ही ऐतिहासिक संपत्ती आहे. त्याची पडझड थांबविण्याचे कर्तव्य राज्य सरकार पार पाडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली संपत्ती जपली जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील तीन महिन्यांत राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या ७२ निर्णयांचा उल्लेख करताना शेतकऱ्याला केंद्रीत मानून सरकार करत असल्याचे सांगितले.
यंदा राज्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले. मात्र सरकारने वेळ न दवडता तातडीने मदत जाहीर केली. भू-विकास बँकेचे साडेनऊशे कोटींचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तातडीने पंचनामे करून शेतीचे झालेले सर्व नुकसान सरकार देत आहे.
तीन महिन्यांचे अनुभवलेले पर्यटन
संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये सर्वाधिक गड व किल्ले असून, त्याचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगताना यातून पर्यटनाला चालना मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील तीन महिन्यांत आम्ही चांगले पर्यटन केल्याची मिश्किल टिप्पणी करत विकासाच्या माध्यमातून नाशिक दिसेल, असे आश्वासन दिले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका व जिल्हा विकास आराखड्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, माजी नगरसेवक सलीम शेख आदी उपस्थित होते. सपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. नाशिक न्यूजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ-पाटील यांनी स्वागत केले. दीपाली घाटोळ-पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.