Diwali Festival 2022 : कुरकुरीत पदार्थ लई भारी, रोजगार वृद्धीही झाली..!

Diwali Food
Diwali Food esakal

नाशिक : वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरवात होत असल्याने घरांसह सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण तयार झालंय. त्याचवेळी तयार फराळ पदार्थांच्या खरेदीचा उत्साह अधिक आहे. त्यातून किमान दोन हजार पुरुष-महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून उत्सवात अडीच ते तीन कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. (Turnover of 3 crores of snacks prepared in Diwali festival 2022 Nashik Latest Marathi News)

Diwali Food
Diwali Festival: डिझाईनच्या पणत्या, आकाशकंदील, अन झुंबर!

दीपोत्सवात कुरकुरीत, तिखट, गोडधोड पदार्थ डोळ्यासमोर येतात, अन्‌ तोंडाला पाणी सुटते. दीपोत्सवाच्या स्‍वागताची तयारी महिन्‍याभरापूर्वीपासून सुरु होते. गृहिणींमध्ये फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग बघायला मिळते. परंतु सध्या अनेक महिला नोकरी करत असल्‍याने फराळ बनविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशात दीपोत्सवाचा गोडवा वाढविण्यासाठी तयार फराळाच्‍या पदार्थांच्‍या खरेदीला प्राधान्‍य दिले जाते आहे.

ग्राहकांची गरज ओळखून केटरिंग व्‍यावसायिकांकडून फराळाच्‍या तयार पदार्थांची विक्री केली जात आहे. त्‍यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शहरासह उपनगरीय भागामध्ये शंभर ते सव्वाशे दुकानांतून फराळ पदार्थांची विक्री होत आहे. प्रत्‍येक दुकानात तीन ते चार महिला स्‍वयंपाकी व त्‍यांना मदतीसाठी एक, दोन पुरुष सहाय्यक अशा प्रत्‍येक दुकानातून किमान सहा ते सात लोकांना रोजगार उपलब्‍ध होतो आहे. काही दुकानांमध्ये दोन सत्रांमध्ये कामगार काम करताहेत.

Diwali Food
Diwali Nauvari Saree : नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान!

महागाईने दरवाढीचा भडका

गेल्‍या काही कालावधीत किराणा मालाच्‍या किंमती वाढलेल्या आहेत. खाद्यतेलाचे दर चढे असल्‍याने फराळाच्‍या किमतीवर महागाईचा परिणाम झालेला आहे. सुमारे पंधरा ते वीस टक्‍यांपर्यंत किमतीत वाढ झालेली असल्याने ग्राहकांना फराळ पदार्थांची खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, काही ग्राहकांकडून फराळासाठी लागणारा कच्चा माल उपलब्‍ध करून देत मजुरी अदा करून केटरिंग व्‍यावसायिकांकडून फराळाचे पदार्थ तयार करून घेत आहेत. प्रतिकिलोसाठी मजुरी आकारली जात असून, शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते.

गुणवत्तेला दिले जातेय प्राधान्‍य

फराळ पदार्थ तळताना वापरल्‍या जाणाऱ्या खाद्यतेलापासून अन्‍य कच्या मालाच्‍या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अनेक व्‍यावसायिकांकडून ग्राहकांसमोर या वस्‍तू तयार केल्‍या जात असल्‍याने शंकांचे निरसन होत आहे. त्यामध्ये तेलाचा पुनर्वापर टाळला जात असून नामांकित कंपनीच्‍या कच्या मालाचा वापर होत आहे.

Diwali Food
Healthy Plan for Diwali : ‘चटपटीत’चा टाळा मोह, पौष्टिक आहारातून सुदृढ रहा..!

फराळ पदार्थांचे दर

(आकडे प्रतिकिलोसाठी रुपयांत)

मोहनथाळ-------३५० ते ३७०

शंकरपाळे--------३०० ते ३२०

अनारसे----------४५० ते ४७०

करंजी------------४५० ते ४६०

बालूशाही---------२३० ते २६०

रवा लाडू---------२५० ते २८०

बेसन लाडू-------४०० ते ४२०

तिखट शेव------२८० ते ३००

फिकी शेव-------२६० ते २८०

पोहे चिवडा------२६० ते ४००

अन्न ग्रहण करतानाचा नामजप

‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥

जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥’

समर्थ रामदास स्वामी यांचा हा श्‍लोक सर्वांना माहिती आहे. अन्न ग्रहण करताना नामजप केल्याने अन्नाचे पचन सहजतेने होते. अशा पद्धतीने सात्त्विक अन्न प्राणशक्ती देते. नामस्मरण करण्यासाठी पैसे लागत नाहीत. अन्न ग्रहण एक यज्ञ आहे. ईश्‍वराचा प्रसाद म्हणून अन्न ग्रहण केल्याने शरीराला फायदा होतो आणि तृप्ती मिळते.

Diwali Food
Diwali Festival 2022 : पर्यावरण पूरक आकाश कंदीलाची विदेश वारी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com