Nashik News: बागलाणचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होणार; दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्र्यांची आमदार बोरसेंना ग्वाही

MLA Dilip Borse giving a statement to Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Baglan taluka being declared drought prone.
MLA Dilip Borse giving a statement to Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Baglan taluka being declared drought prone.esakal

Nashik News : बागलाण तालुक्यातील खरिपाची पीक आणेवारीतील तांत्रिक मुद्दे शासकीय यंत्रणेमार्फत तपासून दुसऱ्या टप्प्यात बागलाणचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती
आमदार दिलीप बोरसे यांनी आज येथे दिली.

आमदार बोरसे म्हणाले, शुक्रवारी (ता.३) मुख्यमंत्री शिंदे व उपमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन देत बागलाण तालुकावासीयांना दिलासा देण्याचे अभिवचन दिले असल्याचेही स्पष्ट केले. (CM Shinde assured that Baglan will be included in drought taluka in second phase nashik news)

राज्यातील काही तालुक्यात दुष्काळ घोषित झाल्यानंतर त्यातून बागलाण तालुका वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बागलाणमधील खरीप पिके आणि पावसाची स्थिती अतिशय वाईट असताना यंत्रणेने त्याची दखल घेतली गेली नाही.

हे समजताच आमदार बोरसे यांनी तातडीने मुंबई येथे धाव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदींची भेट घेतली. आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. बागलाण मतदारसंघात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.

या संकटातून बाहेर काढण्यासाठी बागलाण तालुका दुष्काळी घोषित करून वीज बिल व कर्जमाफी जाहीर करण्यासोबतच एकरी २५ हजार रुपये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार बोरसे यांनी केली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पाणंद रस्ते, पाझर तलाव गाळमुक्त करणे आदी कामे रोजगार हमी योजनेतून सुरू करावीत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

MLA Dilip Borse giving a statement to Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Baglan taluka being declared drought prone.
Jalyukta Shivar Yojana: दुरुस्तीच्या कामांतून शिवार कसे होणार पाणीदार! 9 कोटींपैकी अडीच कोटींची कामे मंजूर

आमदार बोरसे यांनी निवेदन देऊन मंत्री महोदयांना तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देत तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी आग्रही मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक बाबी तपासून लवकरात लवकर बागलाण तालुका दुष्काळी घोषित करून सर्व शासकीय सवलती देण्यात येतील, असे आश्वासन दिले. साहजिकच आमदार बोरसे यांनी तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा चालवला असल्याने तालुकावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

तर शेतकरी कर्जाच्या विळख्यात

कमी पावसामुळे पिकांची नजर पैसे आणेवारी देखील ५० पैशाच्या आत आहे. कमी पावसामुळे आजच उत्तर पूर्व आणि दक्षिण भागातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असे आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. अशा भयावह परिस्थितीत रब्बी हंगाम पाण्याअभावी अडचणीत येणार आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होऊन शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्याची गरज आहे.

MLA Dilip Borse giving a statement to Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Baglan taluka being declared drought prone.
Onion Subsidy: शेतकरी, निराधारांची यंदाची दिवाळी गोड! राज्यात कांदा अनुदानासाठी 'इतके' कोटी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com