CM Eknath Shinde : जिल्हा बँकेकडून होणारी कारवाई थांबविणार! मुख्यमंत्री शिंदेंची शेतकरी शिष्टमंडळाला ग्वाही

Chief Minister Eknath Shinde while discussing with the committee on Thursday
Chief Minister Eknath Shinde while discussing with the committee on Thursdayesakal
Updated on

Cm Eknath Shinde : नाशिक जिल्हा बँकेकडून जमीन जप्तीची कारवाई थांबविण्यासोबतच सक्तीची वसुली होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकरी संघर्ष संघटना, शेतकरी संघटना समन्वय समिती व नाशिक जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले. (CM Shinde testimony to farmers delegation istrict Bank will stop action nashik news)

सह्याद्री अतिथी गृहावर गुरुवारी (ता.२०) सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाशिक जिल्हा बँकेकडून करण्यात आलेल्या कारवाया त्वरित मागे घेणार, दोन दिवसात प्रधान सचिवांसोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांची पुढील बैठक होऊन शासन निर्णय काढला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

दरम्यान, मागण्या मान्य होण्यासाठी सरकार प्रसन्न झाल्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत म्हणून शुक्रवारी (ता.२१) यज्ञयाग होणार असल्याचे आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आले. शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे,

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Chief Minister Eknath Shinde while discussing with the committee on Thursday
Nashik News : आंतरराष्ट्रीय निधीतून मुलींसाठी शौचालय; वावी विद्यालयासाठी नाशिकरोड रोटरी क्लबचा पुढाकार

नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुषार गांगुर्डे, दत्तात्रय सुडके, दिलीप पाटील, अब्दुल शेख, केशव कदम, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष महेश लासुरे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, अमित गांगुर्डे, मनोज घोडके आदींचा समावेश होता.

"नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आज शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली. खऱ्या अर्थाने जिल्हा बँकेची कारवाई थांबणार असल्याने आंदोलकांसह शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे." - दत्ता सुडके, सदस्य, शेतकरी समन्वय समिती

Chief Minister Eknath Shinde while discussing with the committee on Thursday
Nashik News: पारधींच्या लेकीच्या लग्नाचा खर्च स्वराज्य संघटना करणार; आपदग्रस्त कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com