Youth Protest
sakal
नाशिक: मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी युवक नाशिकमध्ये एकवटले आहेत. या युवकांनी ईदगाह मैदान येथे बुधवारी (ता. ५) ठिय्या मांडला. शासनदरबारी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत शहर न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.