Ritwikesh Saindane
sakal
सटाणा: ‘ऋत्विकेश बाळ...’ हा शब्द कानावर पडताच तो चिमुकला क्षणभर थांबला... मागे वळून पाहिले... काही सेकंदांचा निःशब्द थांबा... आणि मग आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा बांध फुटला. जन्मापासून ज्या आयुष्यात आवाज, हाका आणि शब्द नव्हते, त्या ऋत्विकेशने आज प्रथमच आईचा आवाज ऐकला होता. तो क्षण केवळ ऐकण्याचा नव्हता, तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. वर्षानुवर्षांची चिंता, भीती आणि अनिश्चितता त्या एका हाकेत विरघळून गेली.