दिवाळीच्या तोंडावर नारळ कडाडले; भाव वाढल्याने विक्रीत घट

Coconut price hike due to petrol-diesel prices rising
Coconut price hike due to petrol-diesel prices risingesakal

मालेगाव (जि. नाशिक) : इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तुंची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे बाजारातील खाद्यपदार्थ, फळांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सामान्य नागरीक व व्यावसायिकांना फटका बसला आहे. मालेगाव शहरात आठवड्याला ३५ हजार शहाळांची (नारळ- Coconut) विक्री होते. नारळामागे १० ते १५ रुपये दरवाढ झाली आहे. सध्या नारळाचे दर ४० ते ५० रुपये नगापर्यंत वाढले आहेत. भाव वाढल्यामुळे नारळांच्या विक्रीतही घट झाली आहे.

पेट्रोल-डिझेल किंमतींच्या वाढीचा नारळाला फटका

कोरोना (Corona) व लॉकडाऊन (Lockdown) काळात शहाळांच्या नारळाला शहरासह सर्वत्र चांगली मागणी होती. २०२० मध्ये २५ ते ३० रुपये नगाप्रमाणे विक्री होत होती. येथील असंख्य हातगाडीचालक नारळ विक्रीचा व्यवसाय करतात. यावर शंभराहून अधिक कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. शहरातील विविध लहान मोठ्या रुग्णालयांबाहेर, बाजारपेठा व प्रमुख चौकांमध्ये नारळ विक्रीची दुकाने लावली जातात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे नारळांच्या वाहतूक खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे २५ ते ३० रुपयांना मिळणारे नारळ सध्या ४० ते ५० रुपयांना मिळत आहे. किंमती वाढल्यामुळे विक्रीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

Coconut price hike due to petrol-diesel prices rising
कांदा तेजीत असतांनाच धाडसत्र कसे? शेतकरी चिंताग्रस्त

नारळ विक्रेते आर्थिक अडचणीत

सध्या मालेगावात महिन्याला एक लाख ४० हजार नारळांची विक्री होते. भाव वाढीमुळे मागणी घटल्याने हातगाडीवर नारळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी हा व्यवसाय बंद करुन दुसरा व्यवसाय सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे. मालेगाव शहरातून कळवण, सटाणा, देवळा, लासलगाव, चांदवड, नामपूर, ताहराबाद, मनमाड, वैजापूर, पिलखोड, येवला, निफाड, चाळीसगाव आदी ठिकाणी शहाळे मोठ्या प्रमाणात विक्रीला जातात. वाहतूक भाडे वाढल्याने ग्रामीण भागातूनही शहाळ्यांची मागणी कमी झाली आहे. एकूणच इंधनदरवाढीचा फटका सामान्य नागरिक व व्यावसायिकांना बसत असून, त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर होत आहे.

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे

शहाळ्याचे पाणी पिल्याने पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. तसेच, शरीराला अशक्तपणा, थकवा, चक्कर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. नारळाच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटामिन - सी यासारखे पोषक तत्व असतात. आरोग्यालाही फायदेशीर ठरते.

''नारळाच्या किंमतीत सतत भाववाढीमुळे विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे रोजगार घटला आहे. महागाई सतत वाढल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे.'' - जावेद हाजी, घाऊक विक्रेता

Coconut price hike due to petrol-diesel prices rising
मोदी सरकराने लसीकरणाची जाहिरातबाजी थांबवावी - पृथ्वीराज चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com